Inflation And Deflation Rate In India. Dainik Gomantak
अर्थविश्व

Inflation: सर्वासामान्यांना दिलासा! फेब्रुवारीमध्ये महागाई घटली, खाद्यपदार्थही होणार स्वस्त

Deflation: इतर उत्पादनांबरोबरच खाद्यपदार्थही फेब्रुवारीमध्ये स्वस्त होतील. फेब्रुवारीमध्ये अन्नधान्य चलनवाढ 7.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Ashutosh Masgaunde

Inflation And Deflation Rate In India:

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने खाद्यपदार्थांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासह केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ महागाई सातत्याने घसरत आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये ती आणखी घसरून 5 टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा आहे. याआधी, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (CPI) तीन महिन्यांपासून सतत पाच टक्क्यांच्या वर राहिली आहे. जानेवारी 2024 मध्ये ती 5.10 टक्के होती.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थ आणि इंधन-विजेच्या किमतीत नरमाईमुळे फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर 4.87 टक्क्यांवर येईल.

इतर उत्पादनांबरोबरच खाद्यपदार्थही फेब्रुवारीमध्ये स्वस्त होतील. फेब्रुवारीमध्ये अन्नधान्य चलनवाढ 7.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ८ टक्क्यांहून अधिक होती.

मसाल्यांच्या पदार्थांचा महागाईचा दरही फेब्रुवारीमध्ये 16.4 टक्क्यांवरून 12 टक्क्यांइतका कमी होईल.

हळदीच्या बाबतीत, दर 11.6 टक्क्यांवरून 1.6 टक्क्यांवर येऊ शकतो. जिऱ्याचा महागाई दरही ८९.८ वरून ६६ टक्क्यांवर येईल.

मसाल्यांव्यतिरिक्त फळांचा महागाई दरही दोन टक्क्यांहून कमी होऊन ६.४ टक्क्यांवर येऊ शकतो. जानेवारी 2024 मध्ये त्यांचा महागाई दर 8.7 टक्के होता.

या सर्व बाबी असल्यातीर दूध-धान्यांच्या किमतीत फारसा दिलासा मिळणार नाही. मसाले आणि फळांच्या तुलनेत दूध-धान्यांच्या महागाईत मोठी घट होण्याची शक्यता नाही.

दूध महागाई दर 3.8 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, जो जानेवारीमध्ये 4.6 टक्के होता. धान्याचा महागाई दर ७.८ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांवर येऊ शकतो.

अलिकडच्या काही महिन्यांत दुधाचे दर कमी-अधिक प्रमाणात स्थिर राहिले आहेत. मात्र, गेल्या वर्षी जनावरांमध्ये रोगराई पसरल्याने दुधाच्या दरात मोठी वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT