Indigo Airline Salary Hike
Indigo Airline Salary Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

IndiGo Sweet 16 Anniversary Sale: इंडिगोची सर्वात मोठी ऑफर, वाचा एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

देशातील खासगी एअरलाइन इंडिगोने फ्लाइट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंडिगोने एक स्पेशल अॉफर आणली आहे. इंडिगोने सर्व देशांतर्गत मार्गांवर "Sweet 16" ऑफर आणली आहे. ज्यात फ्लाइटची 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यात 1616 रू. मध्ये फ्लाइट तिकीट दिले जात आहे. ही ऑफर 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून सुरू झाली असून 5 ऑगस्ट ही शेवटची तारिख आहे. या ऑफर अंतर्गत, विमान तिकीट बुक करणारे प्रवासी 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 पर्यंत प्रवास करू शकतील.

इंडिगोने आपल्या वेबसाइटद्वारे माहिती दिली आहे की, ही ऑफर इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडद्वारे ऑफर केली जात आहे. ज्यामध्ये देशांतर्गत मार्गांवर भाडे 1616 रु. पासून सुरू होते. 03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान हवाई तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यान प्रवास करू शकतील. इंडिगोने आपल्या ट्विटमध्ये (Tweet) लिहिले आहे की, IndiGo's Sweet 16 सेल ऑफरचे बुकिंग फ्लाइट डिपार्चरच्या 15 दिवस आधी केले जाऊ शकते.

Sweet 16 ऑफर अंतर्गत किती जागा ऑफर केल्या जात आहेत याचा खुलासा इंडिगोने केलेला नाही. एअरलाइन्सने सांगितले की मर्यादित यादी आहे. त्यामुळे सवलत जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. जो इंडिगोचा स्वतःचा निर्णय असेल. इंडिगोने सांगितले की, ही ऑफर कोणत्याही ऑफर स्कीम, प्रमोशनसोबत जोडली जाऊ शकत नाही. ही ऑफर ट्रान्सफर, एक्सचेंज किंवा कॅश केली जाऊ शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT