UPI transactions Dainik Gomantak
अर्थविश्व

Countries Accepting UPI: फ्रान्स, दुबई, सिंगापूरसह 17 देशांमध्ये भारताच्या UPI चा डंका, अर्थव्यवस्थेला असा फायदा होणार!

Indian Economy Benefit: भारतीय UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार केवळ भारतातच नाही तर परदेशातही वाढत आहेत.

Manish Jadhav

Countries Adopting Indian UPI: भारतीय UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार केवळ भारतातच नाही तर परदेशातही वाढत आहेत, भारतीय UPI चा प्रभाव कायम आहे. नुकताच RBI ने UPI वरुन होणाऱ्या पेमेंटचा डेटा जारी केला आहे.

आकडेवारीनुसार, UPI वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआय निर्देशांकानुसार मार्चमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये 13.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आता भारतीय UPI च्या वापराला फ्रान्स, दुबई आणि सिंगापूरसह 17 देशांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

अहवालानुसार, येत्या 5 वर्षात केवळ भारतातच UPI द्वारे केले जाणारे पेमेंटही 90 टक्क्यांचा आकडा पार करेल. यामुळे डिजिटल पेमेंटचा ट्रेंड तर वाढेलच पण भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होईल.

भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल

दरम्यान, परदेशात UPI सुरु केल्यामुळे जे लोक भारताबाहेर (India) जातील त्यांना फायदा होईल. ते तिथे UPI द्वारे भारतीय रुपयांमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय आणि कोणत्याही चलन विनिमयाशिवाय सहज पेमेंट करु शकतील.

त्यामुळे देशात डिजिटल व्यवहारांची क्रेझ वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.

UPI द्वारे भारतीय रुपयाने परदेशात पेमेंट केल्याने भारतीय रुपया आणखी मजबूत होईल. देशातील लोक कमीत कमी रोख रक्कम वापरत आहेत. अशा परिस्थितीत देशात आणि परदेशात UPI सुरु झाल्यामुळे UPI व्यवहार वाढतील.

परदेशात यूपीआय सुरु झाल्याने भारतीय चलन आणि यूपीआय आणखी मजबूत होणार आहेत. यासोबतच भारताचे स्टिंग आणि त्याची UPI पेमेंट पद्धत परदेशातही झळकणार आहे.

UPI चा वापर करणारे देश

फ्रान्स (France)

भूतान

नेपाळ

ओमान

संयुक्त अरब अमिराती

मलेशिया

थायलंड

फिलिपाइन्स

व्हिएतनाम

सिंगापूर

कंबोडिया

हाँगकाँग

तैवान

दक्षिण कोरिया

जपान

युनायटेड किंगडम

युरोप

परदेशात UPI कसे वापरावे

UPI द्वारे परदेशात पैसे व्यवहार करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुम्ही UPI साठी कोणते प्लॅटफॉर्म वापरता ते डाउनलोड करा.

यानंतर तुमचे बँक खाते त्याच्याशी लिंक करा. बँक खाते लिंक केल्यानंतर, तुम्हाला बँक खाते क्रमांक, आयबीएएन आणि आयबीसी यांसारख्या अॅपमध्ये प्राप्तकर्त्याचे तपशील प्रविष्ट करावे लागतील.

आता सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पेमेंट करु शकाल. वरीलपैकी काही देशांमध्ये UPI सध्‍या सुरु झालेले नाही. सध्या ते प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे हळूहळू त्यात वाढ करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT