INR vs USD Dainik Gomantak
अर्थविश्व

INR vs USD: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात 42 टक्क्यांनी घसरला 'रुपया'

'रूपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे,' असे वक्तव्य सितारमण यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. रूपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठल्याच्या बातम्या रोज प्रसिद्ध होत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी केलेल्या वक्तव्यावरून तर विरोधकांनी भाजपवर कडाडून टीका केली. 'रूपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे,' असे वक्तव्य सितारमण यांनी केले. 2014 साली भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत आला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) काळात भारतीय रुपया 42 टक्क्यांनी घसरला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या संग्रहीत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 58.58 रूपये होता. आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी रुपया 83.12 वरती पोहोचला आहे. मोदींच्या कार्यकाळातील ही वाठ 41.89 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या आठ वर्षांतील रुपयाची घसरण ऐतिहासिक आहे. बुधवारी परकीय चलन व्यवहाराच्या वेळी रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 83 ची पातळी ओलांडली, नंतर तो 82.37 वरती बंद झाला.

गुरुवारी पुन्हा एकदा व्यवहारादरम्यान भारतीय रूपयाने 83 रुपयांची पातळी ओलांडून 83.12 ही नीचांकी पातळी गाठली.

रूपयाचा 'घसरता' आलेख

यावर्षी एप्रिलपासून 2 मे 2022 पर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 76.43 रुपये होती. 2 जून 2022 त्यात 1.5 टक्के घसरण झाली आणि रूपया 77.58 वरती पोहोचला. जूनच्या तुलनेत 1 जुलै 2022 रोजी 1.95 टक्क्यांनी घट झाली आणि ती 79.09 वर पोहोचली. ऑगस्टपर्यंत, ही घसरण काहीशी थांबली होती. पण, 1 ऑगस्ट 2022 रोजी रुपयाने 79.16 चा स्तर गाठला.

यानंतर, 1 सप्टेंबर 2022 रोजी रूपया 79.39 वरती पोहोचला होता. 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत, रूपया पुन्हा 2.96 टक्क्यांनी घसरला आणि 81.74 वरती थांबला. मागील 19 दिवसांत रूपया 1.68 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो 83.12 या त्याच्या नीचांकी पातळीवर स्थिरावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT