Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेची करोडो प्रवाशांना मोठी भेट, आता स्लीपर तिकिटावर करता येणार AC कोचमधून प्रवास!

Indian Railways Latest News: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आता स्लीपर तिकिटावरही एसी कोचमध्ये प्रवास करता येणार आहे.

Manish Jadhav

Indian Railway Rules: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आता स्लीपर तिकिटावरही एसी कोचमध्ये प्रवास करता येणार आहे.

होय... ट्रेनमध्ये दररोज लाखो लोक स्लीपर, जनरल आणि एसी क्लासमधून प्रवास करतात. ट्रेनमध्ये स्लीपर आणि एसी क्लासमधून प्रवास करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला रिझर्वेशन (Train Reservation) करावे लागते.

तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक करुन एसी क्लासमध्ये कसा प्रवास करु शकता. रेल्वेने अनेक नियम केले आहेत, ज्यांची लोकांना माहिती नाही.

रेल्वे ऑटो अपग्रेड सुविधा देते

रेल्वेच्या नियमानुसार विभागाकडून प्रवाशांना (Passengers) ऑटो अपग्रेडेशनची सुविधा दिली जाते. जेव्हा तुम्ही तुमचे रिझर्वेशन करता, तेव्हा तुम्हाला ऑटो अपग्रेड करण्याची संधी मिळते.

यामध्ये तुम्ही ज्या क्लाससाठी तिकीट बुक करता त्या क्लासच्या वरच्या क्लासमध्ये अपग्रेड केले जाते. समजा तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केले असेल तर तुमचे तिकीट थर्ड एसी क्लासमध्ये अपग्रेड होईल.

वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही

या रेल्वे सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ट्रेनमध्ये बसताना ही सुविधा मिळते.

यासोबतच, या ऑटो अपग्रेड सुविधेसाठी तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही, परंतु या सुविधेचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा त्या कोटामध्ये सीट उपलब्ध असेल.

भाड्याचा फरक भरावा लागेल

अनेक वेळा असे घडते की, फर्स्ट आणि सेकंड एसीमध्ये ट्रेनमधील अनेक सीट्स रिकाम्या राहतात. त्यांचे भाडे जास्त असल्याने ते रिक्त राहतात.

यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरु केली आहे. सध्याच्या क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये अपग्रेड करण्यासाठी, तुम्हाला त्या क्लाससाठी रिझर्वेशन शुल्क तसेच दोन क्लाससाठी भाड्यातील फरक भरावा लागेल.

तुम्ही TTE शी देखील संपर्क साधू शकता

याशिवाय, तुम्ही TTE शी संपर्क करुन तुमची सीट अपग्रेड करु शकता. जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असाल.

जर तुम्हाला एसी क्लासमध्ये प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला फक्त प्रवासाच्या वेळी डब्यात असलेल्या टीटीईशी संपर्क साधावा लागेल.

तुम्हाला टीटीईला सांगावे लागेल की, तुम्हाला स्लीपर क्लास ते एसी क्लासचा प्रवास करायचा आहे. टीटीई तुम्हाला एसी क्लासमध्ये बर्थ देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

Malaika Arora Birthday: मलायका अरोरानं गोव्यात साजरा केला 50वा वाढदिवस, वयावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण; अखेर बहिणीने केला खुलासा VIDEO

Goa Cabinet Decision: सरकारी नोकरीसाठी 'कोकणी' अनिवार्य! गोवा कॅबिनेटचा मोठा निर्णय; जीएमसी आणि मडगावातील ESI रुग्णालयांत कंत्राटी भरतीलाही मंजुरी

भारतानंतर आता अफगाणिस्तानचा पाकड्यांना मोठा दणका! तालिबानही रोखणार पाणी, कुनार नदीचा मुद्दा तापला; पाण्यासाठी होणार बेहाल!

SCROLL FOR NEXT