Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलं मोठं गिफ्ट, ट्रेनमध्ये मिळणार 'या' मोफत सुविधा!

Indian Railway News: तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि रेल्वेने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला रेल्वेकडून अनेक सुविधा मिळणार आहेत.

Manish Jadhav

Indian Railways Ticket Concession: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वेकडून वेळोवेळी अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. आता रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि रेल्वेने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला रेल्वेकडून अनेक सुविधा मिळणार आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली

रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, विभागाकडून दररोज 10,000 हून अधिक गाड्या धावतात आणि त्यामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) अनेक सुविधा मिळतात. ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये कन्फर्म लोअर बर्थची सुविधा मिळत आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये वेगळी तरतूद आहे.

45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवाशांना लोअर बर्थसाठी कोणताही पर्याय निवडावा लागणार नाही. या प्रवाशांना रेल्वेच्या बाजूने आपोआप लोअर बर्थ मिळेल.

गर्भवती महिलांनाही ही सुविधा मिळते

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांसाठी स्लीपर श्रेणीमध्ये 6 लोअर बर्थ राखीव आहेत. यासोबतच 3AC मध्ये प्रत्येक कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ, 2AC मध्ये प्रत्येक डब्यात तीन ते चार लोअर बर्थ ठेवण्यात आले आहेत.

रेल्वे तिकिटावर सवलत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले त्यांनी सांगितले की, याशिवाय रेल्वेत लोअर बर्थ रिकामा असल्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगजन आणि महिलांना अप्पर बर्थ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

कोणाला किती सूट मिळायची? रेल्वेने जारी केलेल्या अहवालानुसार, यापूर्वी रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना भाड्यात 40% सवलत देत असे. दुसरीकडे, जर महिलांना (Women) दिलेल्या सूटीबद्दल बोलायचे झाल्यास, या लोकांना वयाच्या 58 व्या वर्षापासून 50 टक्के सूट मिळत होती. ही सूट मेल, एक्सप्रेस, राजधानीसह सर्व प्रकारच्या ट्रेनमध्ये दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT