Railway Ticket Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वे देतेय दरमहा 80,000 रुपये कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?

Business Idea: जर तुम्हीही बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही रेल्वेबरोबर मिळून करु शकता.

Manish Jadhav

Business Idea: जर तुम्हीही बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही रेल्वेबरोबर मिळून करु शकता. रेल्वे तुम्हाला दरमहा सुमारे 80,000 रुपये कमावण्याची संधी देत ​​आहे.

या व्यवसायासाठी (Business), तुम्हाला फक्त इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या दरमहा हजारो रुपये कमवू शकता. तुम्ही हा व्यवसाय कसा सुरु करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दरमहा 80,000 पर्यंत कमाई

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ही रेल्वेची सेवा आहे. याद्वारे रेल्वे तिकीट बुकिंगपासून इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आता तुम्ही IRCTC च्या मदतीने दरमहा हजारो रुपये कमवू शकता.

यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून कमाई करु शकाल. यासाठी तुम्हाला फक्त तिकीट एजंट व्हावं लागेल. त्याऐवजी तुम्ही महिन्याला 80 हजार रुपये कमवू शकाल.

तुम्ही IRCTC एजंट बनून कमाई करु शकता

ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवर लिपिक तिकीट काढतात, त्याचप्रमाणे तुम्हालाही प्रवाशांची तिकिटे काढावी लागतील. ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल.

त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल आणि घरी बसून मोठी कमाई करु शकाल. तुम्ही IRCTC चे अधिकृत तिकीट बुकिंग एजंट बनल्यास, तुम्ही तात्काळ, RAC इत्यादींसह सर्व प्रकारची रेल्वे तिकिटे बुक करु शकता. एजंटना तिकिटांच्या बुकिंगवर IRCTC कडून भरीव कमिशन मिळते.

अशा प्रकारे जबरदस्त कमाई होईल

जर तुम्ही एजंट असाल आणि प्रवाशासाठी नॉन एसी कोचचे तिकीट बुक करत असाल, तर तुम्हाला प्रति तिकीट 20 रुपये आणि आयआरसीटीसीकडून एसी वर्गाचे तिकीट बुक करण्यासाठी 40 रुपये कमिशन मिळेल. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्का रक्कमही एजंटला दिली जाते.

किती फी भरावी लागेल?

IRCTC चे एजंट होण्यासाठी काही फी देखील भरावी लागते. एका वर्षासाठी एजंट होण्यासाठी IRCTC ला 3999 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला दोन वर्षांसाठी एजंट व्हायचे असेल तर तुम्हाला रु. 6999 भरावे लागतील.

याशिवाय, एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिटे बुक करण्यासाठी प्रति तिकीट 10 रुपये, तर महिन्याभरात 101 ते 300 तिकीट बुक करण्यासाठी प्रति तिकीट 8 रुपये आणि अधिक बुकिंगसाठी प्रति तिकीट 8 रुपये द्यावे लागतील. एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटे. पाच रुपये तिकीट फी भरावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

सत्तरीत विचित्र घटना! भर बाजारात सापडली हाडं,परिसरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा

Viral Video: चोराला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बहाद्दर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी अवाक; म्हणाले, 'ही तर ब्रूस लीची आजी...'

Goa Politics: काँग्रेसहून आलेले आठ आमदार 'डेंजर झोन'मध्ये; दामूंच्या 27 जागांचा संकल्प भाजपसाठी थट्टेचा विषय ठरणार?

BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT