Ashwini Vaishnaw  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: मोठी बातमी, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार रेल्वे भाड्यात सवलत; संसदेत मोठा खुलासा!

Indian Railways Big Update: रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सूटबाबत एक विशेष अपडेट समोर आली आहे.

Manish Jadhav

Indian Railway Train Ticket Concession For Senior Citizen: रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सूटबाबत एक विशेष अपडेट समोर आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर दिलेली सूट पुन्हा एकदा बहाल केली जाऊ शकते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना आणि 58 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना रेल्वेकडून रेल्वे तिकिटांमध्ये मोठ्या सवलतीचा लाभ मिळत होता, जो पुन्हा सुरु केला जाऊ शकतो.

समितीने आग्रह केला

भारतीय रेल्वेवरील संसदीय समितीने सरकारला (Government) रेल्वेच्या बाजूने सूट पुनर्संचयित करण्याची विनंती केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखालील रेल्वे मंत्रालयावरील संसदीय स्थायी समितीने रेल्वे मंत्रालयाला ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) दिलेली सवलत पुनर्संचयित करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती केली आहे.

वृत्तसंस्थेला दिलेली माहिती

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, समितीने सांगितले की, रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची स्थिती सामान्य झाली आहे.

समितीने प्रवासी आरक्षण व्यवस्थेवरील 12 व्या कृती अहवालात (17 वी लोकसभा) ही इच्छा व्यक्त केली होती. किमान स्लीपर क्लास आणि थर्ड एसी क्लासमध्ये याचा विचार केला जाऊ शकतो, जेणेकरुन दुर्बल आणि खरोखर गरजू नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

पूर्वी सूट मिळायची

मार्च 2020 पूर्वी, रेल्वे महिलांना भाड्यात 50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत रेल्वेने प्रवास करण्यासाठी सर्व वर्गातील पुरुषांना 40 टक्के सवलत देत असे.

रेल्वेकडून ही सूट मिळण्यासाठी वृद्ध महिलांसाठी किमान वयोमर्यादा 58 वर्षे आणि पुरुषांसाठी 60 वर्षे होती, मात्र कोरोनाच्या कालावधीनंतर त्यांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली होती

डिसेंबरमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलती पुन्हा बहाल केल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते.

रेल्वेकडून पेन्शन आणि पगाराचे बिल खूप वाढले आहे. यासोबतच भारतीय रेल्वेने प्रवाशांशी संबंधित सेवांसाठी 59000 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT