Indian Railway: रेल्वे भाड्यात मिळणार मोठी सवलत, रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेने...!

Indian Railway Concession: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सूटबाबत बरीच माहिती दिली आहे.
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Indian Railway Concession For Passenger: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सूटबाबत बरीच माहिती दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट रेल्वे पुन्हा सुरु करणार आहे. यासोबतच पात्रता निकषांमध्येही काही बदल करण्यात आल्याची चर्चा आहे.

वयोमर्यादा बदलेल का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) वयोमर्यादा बदलण्याचा विचार करत आहे. याशिवाय तिकिटावरील सवलत काही श्रेणींपुरती मर्यादित असेल. दुसरीकडे, पूर्वीबद्दल बोलायचे झाल्यास, पूर्वी सर्व श्रेणीतील लोकांना सवलत मिळत असे.

Ashwini Vaishnaw
Indian Railway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा

लवकरच नियम बनवले जातील

रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीचे अनुदान कायम ठेवून या सवलतींचा खर्च कमी करण्याचा विचार आहे. आत्तापर्यंत, अद्याप कोणत्याही अटी आणि शर्तींवर निर्णय घेतलेला नाही.

53% सूट मिळवा

माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सूट मिळते. यासोबतच दिव्यांग, विद्यार्थी (Students) आणि रुग्णांना या सूटशिवाय अनेक प्रकारच्या सवलती मिळतात.

Ashwini Vaishnaw
Indian Railways: ट्रेनला नावे कशी दिली जातात तुम्हाला माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल

कोणत्या वर्गात सवलत दिली जाईल?

लोकसभेत रेल्वे तिकिटावर रेल्वे पुन्हा सवलत देणार का, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना रेल्वे सवलतीबाबत विचारण्यात आला. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे.

याशिवाय, स्लिपर आणि थर्ड एसी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत देण्याची सूचना संसदेशी संलग्न स्थायी समितीने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Railway Pass New Rules 2026
India Own Smartphone Brand By 2028
southern railway loud music ban trains
Diwali Gift For Indian Railways Employees