पश्चिम मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) शिकाऊ पदांवर बंपर भरती होणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. पश्चिम मध्य रेल्वेतर्फे शिकाऊ उमेदवारांची 2,226 पदे भरली जाणार आहेत (Indian Railway Recruitment). या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. (Indian Railway Recruitment: Central Railway job openings for 2,226 posts)
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचे इयत्ता 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याशिवाय, त्यांच्याकडे NCVT किंवा SCVT यांचेकडून प्राप्त राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील अनिवार्य असणार आहे. या पदासाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
कशी असणार निवड प्रक्रिया
अधिसूचनेनुसार, सर्व उमेदवारांचे हायस्कूल आणि आयटीआयचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. आणि जे उमेदवार ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतील त्यांची निवड या पदांसाठी केली जाईल.
अनुसूचित जाती/जमाती, अपंग व्यक्ती, महिला वगळता सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/ई-वॉलेट इत्यादींचा वापर करून उमेंदवाराला पेमेंट करता येणार आहे.
कसा कराल या पदांसाठी अर्ज
अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, सर्वप्रथम, wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावून लॉगइन करावे लागेल
वेबसाइटवर दिलेल्या अर्जावर क्लिक करा.
फॉर्ममध्ये विचारलेली माहिती सबमिट करावी लागेल.
माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे सबमिट करावी लागतील
नंतर फोटो अपलोड करून डिजिटल स्वाक्षरी स्वाक्षरी अपलोड करा
ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट मिळणार
रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून पूर्व विभागात देखील शिकाऊ पदासाठी बंपर भरती होणार आहेत. एकूण 3366 पदांसाठी ही भरती होणार असून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना RRC च्या अधिकृत वेबसाइट www.rrcer.com वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आज संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर शुल्क जमा करण्याची अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली आहे. यासाठीची गुणवत्ता यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.