Indian Oil plat to set 2000 EV charging stations Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Oil देशात उभारणार 2000 लेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन

याआधी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने अलीकडेच देशात 5000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणार असल्याचे सांगितले होते

दैनिक गोमन्तक

देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electrical Vehicle) पायाभूत सुविधा अतिशय वेगाने तयार केल्या जात आहेत.त्याच अनुषंगाने इंडियन ऑइल (Indian Oil) कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एसएम वैद्य म्हणाले की, कंपनी येत्या 12 महिन्यांत आम्ही देशभरात 2000 इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) करणार आहे . पुढील दोन वर्षांत आणखी 8000 चार्जिंग स्टेशन्स बांधण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगतिले आहे. त्याचबरोबर कंपनीने येत्या तीन वर्षांत देशात 10,000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य देखील ठेवले असल्याचे वैद्य यांनी सांगितले आहे. (Indian Oil plat to set 2000 EV charging stations)

याआधी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने अलीकडेच देशात 5000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणार असल्याचे सांगितले होते.तसेच कंपनीचे लक्ष्य 5000 पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स बसवण्याचे लक्ष आलस्याचे देखील चपीसीएलचे सीएमडी मुकेश कुमार सुराणा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते म्हणाले की, काही पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आधीच बसवण्यात आले आहेत. कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पूर्वीप्रमाणेच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे लोक पेट्रोल पंपावरच इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकतील.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या इलेक्ट्रिक बाइक्स किंवा टू-व्हीलर स्कूटर आणि बाइक्स या क्षेत्रातही मोठी स्पर्धा आहे. ई-बाईकच्या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या आपले प्रोडक्ट बाजारात दाखल केले आहेत, ज्यामध्ये TVS, Bajaj आणि Hero यांची नावे आहेत. या कंपन्यांनी यापूर्वीच ई-बाईक बाजारात आणल्या आहेत.आणि नुकतीच ओला कंपनीनने देखील आकर्षक किमतीत ई-स्कूटर्सची विक्री सुरू केली आहे.आणि यामुळेच इ बाइक्स मार्केटमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे.

नितीन गडकरी देखील E-BIKE साठी आशावादी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांना पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने बंद करायची आहेत . ते येत्या ३-४ महिन्यांत बायो-इंधन वाहनांशी संबंधित ऑर्डर जारी करणार येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.यावर अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की, 'देशातील इलेक्ट्रिक वाहनांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या ई-स्कूटर, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर, ई-रिक्षा, ई-कार्ट, ई-बाईक यासारख्या छोट्या इलेक्ट्रिक वाहनांना देशात चांगला प्रतिसाद आहे. आणिक लोक त्याचा वापर करतात आणि त्यामुळे लवकरच ग्रीन-हायड्रोजनवर चालणाऱ्या इंटरसिटी बसेस देखील सादर केल्या जातील. असे आश्वासन देखील तयांनी यावेळी दिले आहे . बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणि इंधन सेल वाहन तंत्रज्ञान एकमेकांना पूरक आहेत. देश आता 2050 पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना मागे टाकण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे देखील नितीन गडकरींनी स्पष्ट केलं होतं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT