Cyber Crime Dainik Gomantak
अर्थविश्व

Cyber Crime: देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 7000 कोटींची फसवणूक

Cyber Crime: 2024 च्या पहिल्या चार महिन्यांत विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमुळे भारतीयांना 7061.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

Cyber Crime: देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारताच्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वर दररोज सुमारे 7,000 सायबर संबंधित तक्रारी दाखल केल्या जातात. सायबर गुन्ह्याशी संबंधित आणखी एक आकडेवारी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. एका अहवालानुसार, 2024 च्या पहिल्या चार महिन्यांत विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमुळे भारतीयांना 7061.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

I4C चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, या गुन्ह्यांमध्ये वापरलेले अनेक वेब ॲप्लिकेशन मॅंडरिन भाषेत लिहिलेले आहेत. त्यामुळे भारतावर (India) परिणाम करणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये चीनचा हात असण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे चीनही अशा स्कॅमचा बळी ठरला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2024 मध्ये (30 एप्रिलपर्यंत) एकूण 7,40,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये 1.56 दशलक्ष तक्रारी, 2022 मध्ये 9,66,000 तक्रारी, 2021 मध्ये 4,52,000 तक्रारी, 2020 मध्ये 2,57,000 तक्रारी आणि 2019 मध्ये केवळ 26,049 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.

विविध प्रकारच्या स्कॅममुळे भारतीयांना कष्टाने कमावलेल्या पैशांना मुकावे लागते. सीईओ कुमार म्हणाले की, ‘’गेल्या काही महिन्यांत देशात सायबर गुन्ह्यांमध्ये एकूण 7,061.51 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ज्यापैकी आम्हाला सुमारे 12 टक्के वसूल करण्यात यश आले आहे, जे सुमारे 812.72 कोटी रुपये आहेत.’’

हे स्कॅम गेल्या चार महिन्यांत सर्वाधिक दिसून आले:

  • डिजिटल अरेस्ट स्कॅम: रु. 120.30 कोटी

  • ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम: रु 1,420.48 कोटी

  • इन्वेस्टमेंट स्कॅम (टास्क-बेस्ड): रु. 222.58 कोटी

  • रोमान्स/डेटिंग स्कॅम: 13.23 कोटी रुपये

दरम्यान, फसवणूक करणारे लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात, ज्यात कॉल स्पूफिंग, सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करणे, नोकरीच्या आकर्षक ऑफर देणे आणि काही तास ऑनलाइन काम करुन भरपूर पैसे मिळवणे यांचा समावेश होतो.

कुमार म्हणाले की, दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधील सायबर गुन्हेगार बनावट नोकरीच्या ऑफरसह भारतीयांना भरती करण्यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) वापर करतात. एकदा भरती झाल्यानंतर, या व्यक्तींना गुंतवणूकदार स्कॅम, ट्रेडिंग ॲप स्कॅम आणि डेटिंग स्कॅमसह सायबर स्कॅममध्ये भाग घेण्यास भाग पाडले जाते. भारतीयांना लक्ष्य करण्यासाठी गुन्हेगार भारतीय सिमकार्डचा वापर करतात.

गेल्या चार महिन्यांत सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यांनी 3,25,000 बनावट खाती गोठवली आहेत, IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत 3,000 हून अधिक URL आणि 595 ॲप्स ब्लॉक केले आहेत आणि जुलै 2023 पासून 5,30,000 सिमकार्ड आणि 80,848 IMEI नंबर निलंबित किंवा रद्द केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT