Indian Economy  Dainik Gomantak
अर्थविश्व

India's Economy: भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा वेगाने प्रगती करेल, मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल

2022-23 वर्षात भारत संपूर्ण आशियात सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोना सारख्या वैश्विक महामारीनंतर अनेक देश आर्थिक संकटात सापडले आहेत. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश (Economic crisis in Srilanka, Pakistan And Bangladesh) सारखे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) देखील फटाका बसला असून, वाढणाऱ्या महागाईतून त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. अशात मॉर्गन स्टॅन्ले ( Morgan Stanley) या संस्थेने 2022-23 वर्षात भारत संपूर्ण आशियात सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल. तसेच, भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा वेगाने प्रगती करेल. असे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे.

मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दशकात सर्वोत्तम कामगिरी करणारी अर्थव्यवस्था राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी (Indian GDP) सरासरी 07 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक असेल.

मॉर्गन स्टॅनलेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ चेतन अह्या यांनी असे म्हटले आहे की, 'आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अत्यंत सकारात्मक आहोत. अलीकडच्या काळातील माहिती हे निर्देशित करते की भारत देशांतर्गत मागणीसाठी चांगल्या स्थितीत आहे. सरकार देखील चांगली धोरणं घेऊन येत आहे. त्यामुळे खाजगी भांडवली खर्च वाढण्यास मदत होईल.'

मार्च 2022 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंची किंमत वाढल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. रिझर्व्ह बँकेला (RBI ) देखील व्याजदर वेगाने वाढवण्याची गरज भासणार नाही. पण, पुरवठा साखळी खंडित झाल्याने वस्तूंच्या किमती वाढण्याचा धोका आहे. असे अह्या यांनी अपल्या नोटमध्ये म्हटले आहे. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत RBI ने तीन टप्प्यात रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT