Piyush Goyal Dainik Gomantak
अर्थविश्व

Business Opportunities: मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'या' गोष्टीचा आफ्रिकेत घेतला जातोय शोध!

Africa: मोदी सरकार देशाच्या विकासासाठी सातत्याने पावले उचलत आहे. त्याचबरोबर मोदी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकल्पांवरही काम सुरु आहे.

Manish Jadhav

Africa: मोदी सरकार देशाच्या विकासासाठी सातत्याने पावले उचलत आहे. त्याचबरोबर मोदी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकल्पांवरही काम सुरु आहे. यासोबतच, मोदी सरकारकडून व्यवसायाला चालना देण्यासाठी संधीही शोधण्यात येत आहेत. आता मोदी सरकारच्या एका मंत्र्याने सांगितले की, आफ्रिकेत व्यवसाय आणि गुंतवणूक करण्याच्या शक्यता दिसत आहेत.

गुंतवणूक

दरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, आफ्रिकेत व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. भारतीय कंपन्या तिथे संधी शोधत आहेत. ते पुढे म्हणाले की, दोन्ही क्षेत्रातील उद्योजकांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $200 अब्ज डॉलरच्या उद्दिष्टाच्या पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे. दोन्ही प्रदेशांमधील द्विपक्षीय व्यापार सध्या सुमारे $100 अब्ज इतका आहे.

व्यापारी संबंध

गोयल पुढे म्हणाले की, 'आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी भारत (India) आफ्रिकेसोबत मुक्त व्यापार करारासाठी (FTA) वाटाघाटी करु शकतो.' भारत-आफ्रिका ग्रोथ पार्टनरशिप' या विषयावरील CII-एक्झिम बँक परिषदेत बोलताना गोयल म्हणाले की, "भारतीय कंपन्या या क्षेत्रातील अनेक संधी शोधत आहेत. त्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि आफ्रिकेत नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करु शकतात."

आफ्रिकेशी व्यापार

वाढत्या व्यापाराच्या संदर्भात 'आम्ही अद्याप आमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकलो नाही' असेही गोयल म्हणाले. आम्ही आफ्रिकेचा एक सच्चा मित्र म्हणून काम करतो. सध्या भारत आणि आफ्रिकेदरम्यान अनेक क्षेत्रात काम सुरु आहे आणि अनेक भारतीय कंपन्या आफ्रिकेत वेगवेगळ्या प्रकल्पांवर (Project) काम करत आहेत, असेही गोयल शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT