FM Nirmala Sitharaman  Dainik DainikGomantak
अर्थविश्व

Indian Economy: ''भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल...''; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं वक्तव्य

Indian Economy: भारत 2027-28 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

Manish Jadhav

Indian Economy: भारत 2027-28 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सध्या 50 कोटींहून अधिक भारतीयांची बँक खाती आहेत, तर 2014 मध्ये ही संख्या 15 कोटी होती. गेल्या 8-9 वर्षात देशात $595 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (FDI) आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्स होईल. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला संबोधित करताना, सीतारामन म्हणाल्या की, “हे शक्य आहे की आपण आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू. तोपर्यंत देशाचा जीडीपी पाच ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असेल.''

सध्‍या, 3.4 ट्रिलियन डॉलर्ससह भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी त्यात पुढे आहेत. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे, तर गेल्या आर्थिक वर्षात तिचा विकास दर 7.2 टक्के होता.

गेल्या आठ-नऊ वर्षांत 595 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली

व्हायब्रंट गुजरात समिट 2024 दरम्यान बोलताना सीतारामन म्हणाल्या की, 2023 पर्यंत 23 वर्षांत भारतात $919 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आली आहे. मोदी सरकारच्या गेल्या आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात या एफडीआयपैकी 65 टक्के (595 अब्ज डॉलर्स) एफडीआय आला असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आर्थिक समावेशाचा उल्लेख करताना सीतारामन म्हणाल्या की, बँक खाती असलेल्या लोकांची संख्या 50 कोटी झाली आहे, तर 2014 मध्ये केवळ 15 कोटी लोकांकडे बँक खाती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT