Koo App: देसी ट्विटर 'कू' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकाने लिंक्डइनवर पोस्ट करत दिली माहिती
Koo App 
अर्थविश्व

Koo Shut Down: देसी ट्विटर 'कू' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकाने लिंक्डइनवर पोस्ट करत दिली माहिती

Manish Jadhav

भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू' आता बंद होत आहे. कू ॲपचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की ऑनलाइन मीडिया फर्म डेलीहंटशी अधिग्रहणासंबंधी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर चार वर्षे जुन्या स्टार्टअपने 'कू' बंद करण्याचा निर्णय घेतला. कू X चा देसी पर्याय म्हणून लाँच करण्यात आले होते. अनेक सेलिब्रिटी आणि मंत्र्यांनी कू चा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. विशेष म्हणजे, कंपनीला गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच नायजेरिया आणि ब्राझीलमध्ये विस्तार करण्यात देखील यश मिळाले होते.

कू ची स्थापना 2020 मध्ये अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका या उद्योजकांनी केली होती. 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असलेली ही पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती. ॲपचा लोगो एक पिंक पक्षी होता. विशेष म्हणजे ते लाँच झाल्यापासून सुमारे 60 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले. टायगर ग्लोबल-समर्थित कू स्टार्टअपने आतापर्यंत Accel, 3one4 कॅपिटल, नवल रविकांत, बालाजी श्रीनिवासन, कलारी कॅपिटल आणि इतरांकडून $65 दशलक्ष उभारले आहेत.

आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये माहिती देताना अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले की, 'सोशल मीडिया असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्पेस किंवा इलेक्ट्रिक वाहने, या क्षेत्रांमध्ये महत्त्वाकांक्षी उत्पादने लाँच करण्यासाठी आणि संपूर्ण जगाला आव्हान देण्यासाठी लॉन्ग-टर्ममध्ये कॅपिटलची आवश्यकता असते.'

सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 1 कोटीवर पोहोचली होती

एक वेळ अशी होती जेव्हा कूच्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 21 लाखांवर पोहोचली होती. इतकेच नाही तर कंपनीच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 1 कोटींवर पोहोचली होती. या प्लॅटफॉर्मवर 9 हजार VIP लोकांची खाती होती. या व्यासपीठाचा राजकारण्यांनीही भरपूर प्रचार केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT