Russia Offer to India Dainik Gomantak -
अर्थविश्व

रशियाने भारताला दिली 'ही' खास ऑफर

रशियाने भारतासमोर मांडलेल्या प्रस्तावानुसार रशियन चलन रुबल भारतीय बँकेत जमा केले जातील.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनवर हल्ला करून खूप मोठी जीवतहानी आणि वित्तहानी केली आहे. यामुळे अमेरिका (America) आणि इतर अनेक देशांनी रशियावर (Russia) निर्बंध लागू केले. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी मोठे निर्णय घेतले आहे. भारत (India) आणि रशियामधील व्यापाराच्या दृष्टीने रशियाने भारतासमोर मोठा प्रस्ताव मांडला आहे. भारताला रशियाकडून शस्त्राशस्त्रे आणि कच्चे तेल हवे आहेत. त्यामुळे रशियाने मांडलेला प्रस्ताव महत्त्वाचा आहे असे म्हंटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाची मेसेजिंग सिस्टिम एसपीएफएस वापरुन रूपी-रुबल डिनोमिनेटेड पेमेंटचा समावेश आहे. पण भारताने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. रशियाचे (Russia) परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भारताला (India) रशियाकडून कच्चे तेल आयात करायचे आहे. तसेच भारताला अत्याधुनिक शस्त्राशस्त्रे देखील रशियाकडून हवे आहेत. तर, दुसरीकडे अमेरिकन निर्बंधानंतर आर्थिक कोंडी कमी करण्यासाठी रशिया देखील प्रयत्न करत आहे.

रशियाने भारतासमोर मांडलेल्या प्रस्तावानुसार रशियन चलन रुबल भारतीय बँकेत जमा केले जातील. त्यांच्या चलनाचे रुपयात बदल होइल. अशाच प्रकारे रुपये आणि रुबलमध्ये चलन विनिमय होईल. या नव्या प्रणालीच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात रशियाचे अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांशी भेट घेण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT