Gold Silver Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीचा पुन्हा भडका! केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासूनच नवे दर लागू

India Gold Import Duty Hike 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्या-चांदीच्या संदर्भात केलेल्या आवाहनानंतर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला.

Manish Jadhav

India Gold Import Duty Hike 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्या-चांदीच्या संदर्भात केलेल्या आवाहनानंतर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कात (Import Duty) मोठी वाढ केली. याचाच अर्थ आता परदेशातून सोने, चांदी आणि प्लॅटिनम आयात करण्यासाठी व्यापाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या दरवाढीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, आयात शुल्काचे हे नवीन दर आज 13 मे 2026 पासून संपूर्ण देशात लागू झाले आहेत.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, सोन्यावरील मूळ आयात शुल्क (BCD) 5 टक्क्यांवरुन वाढवून थेट 10 टक्के करण्यात आले. तसेच, कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) देखील 1 टक्क्यावरुन वाढवून 5 टक्के करण्यात आला. विशेष म्हणजे, जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील एकूण आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन घटवून 6 टक्के केले होते, मात्र आता त्यामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली. या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य जनतेवर आणि दागिने उद्योगावर होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, आयात शुल्क आणि उपकराचे हे वाढीव दर केवळ सोन्याच्या बिस्किटांवरच नव्हे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणारे हुक, पिन, स्क्रू यांसारख्या लहान भागांवरही लागू होतील. याशिवाय, जुन्या धातूंपासून सोने-चांदी काढण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या कचऱ्यावरही (Scrap) करात 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे सराफ आणि व्यापाऱ्यांचा आयात खर्च वाढणार असून, परिणामी सोन्या-चांदीचे दागिने महागणार आहेत. यामुळे सामान्य माणसाला सोने खरेदी करणे आता कठीण होऊ शकते.

भारत हा जगातील सोन्याचा (Gold) दुसरा आणि चांदीचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. सोन्याच्या आयातीचा थेट परिणाम देशाच्या व्यापार तुटीवर आणि परकीय चलन साठ्यावर होत असतो. भारताने 2025 मध्ये तब्बल 58 ते 60 अब्ज डॉलर्सच्या सोन्याची आयात करुन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. 2024 च्या अर्थसंकल्पात सीमा शुल्क घटवल्यानंतर सोन्याच्या आयातीत मोठी तेजी आली होती, मात्र आता ती रोखण्यासाठी सरकारने पुन्हा शुल्कात वाढ करण्याचा पवित्रा घेतला. उद्योगांसाठी धातूंचा वापर करणाऱ्या कंपन्यांचा खर्चही या निर्णयामुळे वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

SCROLL FOR NEXT