Record GST Collection Dainik Gomantak
अर्थविश्व

रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन! एप्रिल महिन्यात सरकारी तिजोरी झाली तुडुंब; 2.11 लाख कोटींच्या नेट रेव्हेन्यूसह महसुलात मोठी वाढ

Historic GST Revenue 2.43 Lakh Crore: वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाने यावेळेस सर्व जुने विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

Record GST Collection April 2026: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एप्रिल 2026 हा महिना सुवर्णक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाने यावेळेस सर्व जुने विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. सरकारी तिजोरीत एप्रिल महिन्यात 2.43 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक महसूल जमा झाला असून हे आतापर्यंतचे सर्वोच्च संकलन मानले जात आहे.

मार्च 2026 मध्ये हे संकलन 2 लाख कोटी रुपये होते, त्या तुलनेत एप्रिलमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये 2.23 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा वार्षिक आधारावर सुमारे 8.7% ची वृद्धी नोंदवण्यात आली. तसेच, नेट जीएसटी महसूल 2.11 लाख कोटी रुपये राहिला असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.3% ची वाढ झाली.

या विक्रमी संकलनामागे केवळ देशांतर्गत मागणीच नाही, तर आयातीतून मिळालेल्या महसुलाचा मोठा वाटा आहे. आयातीशी संबंधित जीएसटी महसुलात 25.8% ची जबरदस्त वाढ झाली असून तो 57,580 कोटी रुपयांवर पोहोचला. त्या तुलनेत देशांतर्गत व्यवसायातून मिळणारा महसूल केवळ 4.3% ने वाढून 1.85 लाख कोटी रुपये इतका राहिला. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की, एकूण महसूल वाढीमध्ये आयातीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

जागतिक स्तरावरील घडामोडींचा, विशेषतः पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम जीएसटीच्या (GST) आकडेवारीवर दिसून आला. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 126 डॉलरच्या पुढे गेल्या होत्या, ज्यामुळे आयात महागली आणि पर्यायाने कर संकलनात वाढ झाली.

महसूल संकलनासोबतच एप्रिल महिन्यात जीएसटी रिफंडमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले. एकूण रिफंड 19.3% ने वाढून 31,793 कोटी रुपये झाला. यामध्ये प्रामुख्याने देशांतर्गत रिफंडमध्ये 54.6% ची मोठी झेप पाहायला मिळाली, तर निर्यातीशी संबंधित रिफंडमध्ये काही प्रमाणात घट झाली. दरम्यान, जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर असले तरी वृद्धीचा वेग थोडा मंदावल्याचे संकेत मिळत आहेत.

मार्चमध्ये वृद्धीचा दर 8.8% होता, जो एप्रिलमध्ये 8.7% वर आला आहे. याचा अर्थ देशांतर्गत खप किंवा मागणीमध्ये थोडी सुस्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक परिस्थिती स्थिर राहिली आणि देशांतर्गत मागणी पुन्हा बळकट झाली, तर आगामी काळातही जीएसटी संकलनाचा हाच वेग कायम राहू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT