India Forex Reserve Record Dainik Gomantak
अर्थविश्व

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

India Forex Reserve Record High 785 Billion Dollars: भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलन साठ्याने आजवरचा सर्वात उच्चांक गाठत नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

India Forex Reserve Record High 785 Billion Dollars: भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलन साठ्याने आजवरचा सर्वात उच्चांक गाठत नवा इतिहास रचला. देशाचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 785 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक टप्प्या पार गेला असून, तो सध्या तब्बल 785.71 अब्ज डॉलरवर पोहोचला. 4 सप्टेंबर रोजी संपलेल्या एकाच आठवड्यात भारताच्या साठ्यात 44.90 अब्ज डॉलरची अभूतपूर्व आणि विक्रमी वाढ झाली. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जागतिक अर्थकारणात भारताची पत आणि ताकद प्रचंड वाढली.

सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, परकीय चलन साठा हा एका प्रकारे देशाचा इमर्जन्सी फंड असतो. देशाकडे पुरेशा प्रमाणात डॉलर आणि परकीय चलन उपलब्ध असल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मूल्य स्थिर राहते. भारत आपल्या आवश्यकतेचा मोठा भाग असलेला कच्चे तेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू परदेशातून आयात करतो. रुपया मजबूत राहिल्याने आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती नियंत्रित राहतात, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेल आणि दैनंदिन वस्तूंची महागाई वाढण्यापासून रोखता येते. थोडक्यात सांगायचे तर, यामुळे महागाईवर थेट लगाम कसण्यास मदत होते.

याशिवाय, मजबूत परकीय चलन साठ्यामुळे देश कोणत्याही आर्थिक संकटापासून पूर्णपणे सुरक्षित राहतो. भूतकाळात श्रीलंका किंवा पाकिस्तानसारख्या शेजारील देशांमध्ये परकीय चलन संपल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता, मात्र भारताकडे कोणत्याही अडथळ्याशिवाय अनेक महिन्यांची आयात सुरळीत सुरु ठेवण्यासाठी भक्कम बॅकअप उपलब्ध आहे. तसेच, ज्या देशाचा फॉरेक्स रिझर्व्ह मजबूत असतो, तिथे विदेशी कंपन्या निर्धास्तपणे गुंतवणूक करतात. भारतात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आल्याने नवनवीन उद्योग-प्रकल्प सुरु होतील आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

SCROLL FOR NEXT