India UAE Trade Deal Dainik Gomantak
अर्थविश्व

भारत अन् UAE मध्ये होणार मुक्त व्यापार करार

India UAE Trade Deal: भारत अन् UAE मध्ये होणार मुक्त व्यापार करार

दैनिक गोमन्तक

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी शुक्रवारी मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी केली आहे. द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी दोन्ही देशांनी या करारावर सहमताने स्वाक्षरी केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि UAE चे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तुक अल मारी (Abdulla bin Touq al Marri) यांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (CEPA) स्वाक्षरी केली आहे. व्हर्च्युअल कॉन्फरन्स दरम्यान या व्यापार करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) हे देखील सहभागी झाले होते.

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोयल म्हणाले की, हा सर्वसमावेशक आणि संतुलित व्यापार करार आहे. "यामुळे दोन्ही बाजूंना मोठ्या व्यावसायिक संधी निर्माण होतील, या करारामुळे आमचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट होण्यास मदत होईल," असे गोयल म्हणाले.

अधिकृत प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले गेले आहे की या करारामुळे भारतीय आणि UAE व्यवसायांना मोठा फायदा होणार आहे. या करारामुळे बाजारपेठेतील प्रवेश वाढण्यास आणि दर कमी करण्यास देखील मदत होईल, असे प्रकाशनात म्हटले आहे. CEPA सह पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, जो सध्या 60 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल अशीही दर्शवली अपेक्षा आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात व्यापार कराराच्या संदर्भात औपचारिकपणे बोलणी सुरू झाली आहे. या करारामध्ये वस्तू, सेवा, मूळ नियम, सीमाशुल्क नियम, सरकारी खरेदी, बौद्धिक संपदा हक्क आणि ई-कॉमर्स यांचा देखील समावेश असणार आहे.

अशा करारांतर्गत, दोन्ही व्यापारी भागीदार दोन्ही देशांदरम्यान व्यापार केलेल्या बहुतेक वस्तूंवरील कस्टम ड्यूटी काढून टाकतात किंवा कमी करतात. तसेच ते सेवा क्षेत्रातील व्यापाराशी संबंधित नियमांचे उदारीकरण करतात आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात.

2020-21 या आर्थिक वर्षात भारत आणि UAE मधील द्विपक्षीय व्यापार $43.3 अब्ज होता. यादरम्यान $16.7 अब्ज डॉलरची निर्यात आणि $26.7 बिलियनची आयात झाली आहे. 2019-20 मध्ये दोन्ही देशांमध्ये $59.11 बिलियनचा व्यापार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT