Union Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: 1992 मध्ये 'इतक्या' उत्पन्नावर भरावा लागत होता आयकर, 30 वर्षे जुना टॅक्स स्लॅब व्हायरल

Income Tax Slabs In Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या वतीने 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Income Tax Slabs In Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या वतीने 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे.

यामध्ये एक नवीन घोषणा करत आयकरात सूट जाहीर करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट वाढवण्यात आली आहे.

म्हणजेच, या उत्पन्नापर्यंत कोणालाही कर भरावा लागणार नाही. दरम्यान, 1992 सालचा आयकर स्लॅब सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यावेळच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागला हे दिसत आहे.

1992 च्या अर्थसंकल्पात नवीन कर स्लॅब

खरंतर, इंडियन हिस्ट्री पिक नावाच्या हँडलवरुन हा फोटो ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. 1992 च्या अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब असे कॅप्शन लिहिले आहे. 28000 हजार रुपयांवर कर नाही.

28001 हजार ते 50000 रुपयांवर 20 टक्के कर. 50001 ते 100000 रुपयांवर 30 टक्के कर आणि 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 40 टक्के आयकर.

स्लॅब तीन भागांमध्ये विभागलेला

हे चित्र त्यावेळचे आहे, जेव्हा 1992 मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमधील (Government) अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी टॅक्स स्लॅबचे तीन भाग केले होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अनेकजण आजच्या बजेटशी तुलना करु लागले. एका यूजरने लिहिले की, तीस वर्षांत जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

येथे 2023 मध्ये, नवीन घोषणेनुसार, अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

जर ते 7 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. 3 ते 6 लाखांपर्यंत तुम्हाला 5 टक्के कर भरावा लागेल आणि 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला 10 टक्के कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT