Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: करदात्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय; असा वाचवू तुम्ही शकता टॅक्स

Income Tax Return Login: आयकर विवरणपत्र भरण्याची वेळ जवळ येत आहे. आयकर भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

Manish Jadhav

Income Tax Return Login: आयकर विवरणपत्र भरण्याची वेळ जवळ येत आहे. आयकर भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्याचबरोबर लोकांच्या कल्याणासाठी योजना करता याव्यात यासाठी सरकारकडून आयकर वसूल केला जातो.

त्याचवेळी, देशात सध्या दोन प्रणालींद्वारे वैयक्तिक कर भरला जाऊ शकतो. एक नवीन कर व्यवस्था आणि दुसरी जुनी कर व्यवस्था.

कर सूट पर्याय

त्याचवेळी, सरकारकडून (Government) करदात्यांना कर सूट देखील दिली जाते. तथापि, जर एखाद्याने नवीन कर प्रणालीनुसार कर भरला तर त्यांना गुंतवणुकीवर कोणतीही कर सूट मिळत नाही.

याशिवाय जर एखाद्याने जुन्या कर प्रणालीनुसार कर भरला तर त्याला आयकर भरताना गुंतवणुकीवर सूटही मिळू शकते. कर वाचवण्यासाठी सरकारने लोकांना अनेक पर्याय दिले आहेत.

आयकर

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करदाते ELSS, PPF, NPS, EPF, कर बचत FD आणि इतर साधनांमध्ये गुंतवणूक करून आर्थिक वर्षात 1,50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करु शकतात.

याशिवाय, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक (Investment) करणे हा कर वाचवण्याचा आणखी एक स्मार्ट मार्ग आहे. करदाते कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या एकूण मर्यादेपेक्षा 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकतात.

आयकर सूट

करदाते त्यांच्या जोडीदारासाठी आणि त्यांच्या अवलंबित मुलांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी रु. 25,000 पर्यंतच्या कपातीचा दावा करु शकतात.

याव्यतिरिक्त, करदाते त्यांच्या पालकांसाठी 25,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करु शकतात. ज्येष्ठ नागरिक दोन्ही श्रेणींसाठी 50,000 रुपयांपर्यंत दावा करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT