FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: सरकारने केली मोठी घोषणा, ITR भरताना 'हे' फॉर्म लक्षात ठेवा; नाहीतर...

ITR: आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. वेगवेगळ्या उत्पन्नानुसार टॅक्स स्लॅब देखील वेगवेगळे असतात.

Manish Jadhav

Income Tax Return: आयकर रिटर्न भरणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. वेगवेगळ्या उत्पन्नानुसार टॅक्स (Tax) स्लॅब देखील वेगवेगळे असतात.

यासोबतच लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया...

आयकर रिटर्न

आता आयकर विभागाने ITR-1 आणि ITR-4 फॉर्म ऑफलाइन स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहेत, जे आर्थिक वर्ष (FY) 2022-23 शी संबंधित आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी वापरले जाऊ शकतात. या संदर्भात, आयकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी ITR फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाइन यूटिलिटी जारी केली आहे.

आयटीआरचे स्वरुप

त्याचवेळी, जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये स्विच करण्यासाठी ITR-1 आणि ITR-4 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आयटीआर 1 आणि आयटीआर 4 मध्ये आयकर रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त अटी लागू केल्या आहेत.

यामध्ये मागील आर्थिक वर्षात व्यवसायातून ₹60 लाखांपेक्षा जास्त उलाढाल, व्यवसायातून मागील आर्थिक वर्षात ₹10 लाखांपेक्षा जास्त उलाढाल आणि मागील आर्थिक वर्षात कापलेला TDS इ.

हे ध्यानात ठेवा

50 लाखांपर्यंत एकूण उत्पन्न (Income) असलेल्या व्यक्ती ITR-1 वापरु शकतात, तर ITR-4 व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) आणि व्यवसायांमधून कमावणाऱ्या कंपन्यांसाठी आहे.

हे फॉर्म यावर्षी फेब्रुवारीमध्ये ITR 2, ITR 3, ITR 5, ITR 6 आणि ITR 7 सोबत सादर करण्यात आले होते. या प्रकरणात, ITR भरताना, योग्य फॉर्म निवडा, ITR चुकीच्या फॉर्ममध्ये भरणे समस्या असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT