Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली मोठी अपडेट, 'या' लोकांना मिळणार सवलत !

Budget 2023: मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या, त्या घोषणांच्या पुढील प्रगतीची माहिती सरकारने दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Income Tax Return: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 काही दिवसांत सादर होणार आहे. लोक या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील, अशीही आशा या लोकांना आहे. दुसरीकडे, मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या, त्या घोषणांच्या पुढील प्रगतीची माहिती सरकारने दिली आहे. याअंतर्गत अनेकांना करात सवलतही देण्यात आली आहे.

आयकर

वास्तविक, 2021-22 च्या अर्थसंकल्पात (Budget) कर आणि NRI बाबत काही तरतुदी करण्यात आल्या होत्या, यामध्ये NRI ला दिलासाही देण्यात आला होता. याबाबत माहिती देताना पीआयबीच्या वतीने एक ट्विटही करण्यात आले असून पुढील प्रगतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

कर सूट

PIB in Uttar Pradesh च्या वतीने ट्विट करुन सांगण्यात आले आहे की, 'अनिवासी भारतीयांना कर सवलत! आयकर कायदा, 1961 चे कलम 89A NRI करदात्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती लाभ खात्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संदर्भात दिलासा देते. नियम 21AAA अधिसूचित. कॅनडा (Canada), युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे अधिसूचित देश आहेत. हे ट्विट इन्कम टॅक्स इंडियाच्या माध्यमातूनही रिट्विट करण्यात आले आहे.

आयकर रिटर्न

अनिवासी भारतीयांना दिलासा देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये माहिती देताना PIB in Uttar Pradesh म्हटले की, 'ज्येष्ठ नागरिकांना दिलासा! आयकर कायदा, 1961 मध्ये कलम 194P समाविष्ट करण्यात आले होते, जे 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ITR भरण्यापासून सूट देते, ज्यांच्याकडे फक्त निवृत्तीवेतन आणि व्याज मिळवलेले उत्पन्न आहे. नियुक्त बँका आणि संबंधित फॉर्म अधिसूचित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT