Reliance Group Chairman Anil Ambani: रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी (Anil Ambani) यांचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. आता अनिल अंबानींवर काळा पैसा कायद्याची करडी नजर आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) अनिल अंबानी यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. दोन स्विस बँक खात्यांमध्ये 814 कोटी रुपयांहून अधिक अघोषित संपत्तीवर 420 कोटी रुपयांच्या करचोरीबाबत आयकर विभागाने अंबानी यांना नोटीस बजावली आहे.
10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो
अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून कर चुकवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अंबानी यांनी सुविचारित रणनीती अंतर्गत परदेशी बँक खात्यात जमा केलेल्या रकमेबद्दल भारतीय कर अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. या संदर्भात ऑगस्टच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. विभागाचे म्हणणे आहे की, अनिल अंबानींवर काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) इम्पोझिशन ऑफ टॅक्स कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये दंडासह कमाल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
जाणूनबुजून परदेशी संपत्ती लपवल्याचा आरोप
अनिल अंबानी यांना बजावलेल्या नोटीसमध्ये आयकर विभागाने त्यांना 31 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. पीटीआयने यासंदर्भात अनिल अंबानी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अंबानी यांच्यावर 2012-13 (AY13) ते 2019-20 (AY20) पर्यंत परदेशात ठेवलेल्या अघोषित मालमत्तेवर कर चुकविल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या सूचनेनुसार, अधिकाऱ्यांना आढळले की अंबानी हे बहामासस्थित कंपनी डायमंड ट्रस्ट आणि नॉर्दर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेडचे आर्थिक योगदानकर्ते आणि फायदेशीर मालक आहेत.
आयकर विभागाला ही माहिती मिळाली
बहामा-आधारित ट्रस्टच्या बाबतीत, आयकर विभागाला आढळले की ते ड्रीमवर्क होल्डिंग्स इंक नावाची कंपनी चालवते. या कंपनीने स्विस बँकेत खाते उघडले आहे, ज्यामध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी $32,095,600 जमा झाले. नोटीसनुसार, ट्रस्टला $25,040,422 चा प्रारंभिक निधी मिळाला होता. हा निधी अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक खात्यातून पाठवण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. अंबानी यांनी 2006 मध्ये ट्रस्ट उघडण्यासाठी केवायसी दरम्यान त्यांचा पासपोर्ट दिला होता. या ट्रस्टच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे.
अनिल अंबानींना करोडोंचा कर भरावा लागेल
त्याच वेळी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये जुलै 2010 मध्ये नोंदणीकृत कंपनीने झुरिचच्या बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते उघडले. विभागाचे म्हणणे आहे की, अनिल अंबानी हे या कंपनीचे आणि कंपनीच्या निधीचे अंतिम लाभार्थी मालक आहेत. या कंपनीला 2012 मध्ये PUSA या बहामामध्ये नोंदणीकृत कंपनीकडून $100 दशलक्ष मिळाले. अनिल अंबानी यांनी तो निधी सेटल केला होता आणि त्याचे लाभार्थी होते. कर अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही स्विस बँक खात्यांमध्ये एकूण 814 कोटी रुपये जमा आहेत आणि त्यावर 420 कोटी रुपयांचे कर दायित्व निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.