CNG Car Dainik Gomantak
अर्थविश्व

CNG Car: सीएनजी कारचं मायलेज आणखी वाढवायचंय? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

इंधन खर्चाच्या बाबतीत पेट्रोल डिझेल पेक्षा सीएनजी कार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतात.

गोमन्तक डिजिटल टीम

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी कार्सची मागणी वाढली आहे. इंधन खर्चाच्या बाबतीत पेट्रोल डिझेल पेक्षा सीएनजी कार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतात. यामुळे भारतात सीएनजी कार्य खूप लोकप्रिय झाल्या आहेत. सीएनजी नसलेल्या कार्समध्येदेखील सीएनजी किट लावले जात आहे. सध्या तर अनेक कार निर्मात्या कंपन्या आपल्या कार्सना सीएनजी व्हर्जनमध्येच लाँच करीत आहेत.

सीएनजी कार वापरतेवेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं असतं -

  • सीएनजीवर कार सुरू करू नये आपली कार सुरू करताना नेहमी पेट्रोलवर सुरू केली पाहिजे सीएनजीवर कार सुरू केल्याने नंतर इंजिनचं नुकसान होते.आपल्या कारचं इंजिन पेट्रोलवर सुरू करून एक वा दोन किलोमीटर कार चालवावी. त्यानंतर सीएनजीवर स्विच करावं असं केल्याने पुढील प्रवास सोपा होण्यासाठी इंजिन लुब्रिकेशनला मदत होते.

  • सीएनजी कारमध्ये चांगला मायलेज मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे एअर फिल्टरची चांगली काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक 5 हजार किमीच्या रेंजनंतर युजर्सनी एअर फिल्टर बदलने आवश्‍यक आहे. एअर फिल्टर बदलण्यामुळे हवेच्या तुलनेत सीएनजी हलकी होते. चांगल्या मायलेजसाठी हवा आणि सीएनजीचा रेशो समान असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे एअर फिल्टरला साफ ठेवले पाहिजे.

  • स्पार्क प्लगकडे दुर्लक्ष करू नका सीएनजी कारमध्ये स्पार्क प्लग खूप लवकर घासले जातात. स्पार्क प्लग वेळोवेळी तपासले पाहिजेत, गरज असल्यास बदलले पाहिजेत. पेट्रोलवर आधारित स्पार्क प्लगचा वापर सीएनजी वाहनांसाठी केला जावा. दुसरी पद्धत म्हणजे प्लगची मेटल टिप आणि स्पार्किंगच्या नेमक्या बिंदूमधलं अंतर कमी करणं यामुळे काही पैसे वाचतील आणि ही एक टिकाऊ पद्धत आहे.

  • उन्हात कार पार्क न करता कायम सावलीत पार्क करावी. याच असा फायदा होतो कि, जेव्हा आपण कारमध्ये पुन्हा बसता तेव्हा कार तापलेली नसते दुसरं म्हणजे सीएनजीचं बाष्पीभवन प्रतिबंधित होते सीएनजी वायू स्वरूपात असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा वेगाने बाष्पीभवन होते सावलीत कार पार्किंग केल्याने बाष्पीभवन टळते.

  • सीएनजी मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करू नका सीएनजी कारची देखरेख व सर्व्हिसिंग टाळल्याने कारचं मोठे नुकसान होऊ शकते सीएनजी कार पैशांची बचत करते यात काही शंका नाही पण देखरेखीकडे दुर्लक्ष महागात पडू शकते. कार व्यवस्थित ठेवल्यारच ती चांगला परफॉर्मन्स देते. अनेक सीएनजी गाड्यांना आग लागण्यामागे देखरेखीत अनियमितता हे एक प्रमुख कारण आहे.

  • टायरचे प्रेशर नेहमी तपासले पाहिजे. टायरचे योग्य प्रेशर केवळ मायलेजच वाढवत नाही तर, युजर्सच्या सुरक्षेसाठीही ते आवश्‍यक असते. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये खासकरुन टायरचे प्रेशर तपासले पाहिजे. टायरमध्ये हवा कमी असल्यास कारवर जास्त दबाव निर्माण होत असतो. त्यामुळे जास्त सीएनजी लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT