IMF Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतासाठी IMF ने वर्तवली धोक्याची घंटा, यावर्षी विकास दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज

IMF: बिघडलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा दाखला देत IMF ने ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

IMF Update: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने मंगळवारी आपल्या ताज्या जागतिक आर्थिक आउटलुकमध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज जुलैमधील 7.4% वरुन कमी करुन 6.8% केला आहे. बिघडलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा दाखला देत IMF ने ही घोषणा केली आहे.

भारताला धक्का!

यापूर्वी, जुलैमध्ये आयएमएफने भारताचा (India) विकास दर 8.2 टक्क्यांवरुन 7.4 टक्के केला होता. त्यानुसार त्यात 0.8 टक्के कपात करण्यात आली. जागतिक घटकांचा प्रभाव आणि कठोर आर्थिक धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास दर कमी राहू शकतो, असे आयएमएफचे म्हणणे आहे. आरबीआयच्या अंदाजापेक्षा हे थोडे जास्त आहे. वास्तविक, केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षात GDP 7.2 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

GDP अंदाज

विशेष म्हणजे, पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.1 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. IMF ने जुलैमध्ये एप्रिल 2022 मध्ये सुरु झालेल्या आर्थिक वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.4 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज या वर्षी जानेवारीत वर्तवण्यात आलेल्या 8.2 टक्क्यांपेक्षा कमी होता. 2021-22 या आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) भारतात 8.7 टक्के दराने आर्थिक वाढ झाली.

फिच रेटिंगचे काय चालले आहे?

तत्पूर्वी, फिच रेटिंग्सने अलीकडेच चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 7.8 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांवर आणला होता. फिचने सांगितले की, जूनमध्ये 7.8 टक्क्यांच्या वाढीच्या अंदाजाच्या तुलनेत 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर पुढील आर्थिक वर्षातही विकास दर 7.4 टक्क्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा 6.7 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT