ICICI Securities Delisting: ICICI सिक्युरिटीज संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आज झालेल्या बोर्डाच्या बैठकीत ICICI सिक्युरिटीजच्या डिलिस्टिंगला मंजूरी देण्यात आली आहे.
सध्या, ICICI सिक्युरिटीज ही देशातील पाचवी सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी आहे. आतापासून ती ICICI बँकेची उपकंपनी बनेल, ICICI सिक्युरिटीजचे शेअर्स असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना त्या बदल्यात ICICI बँकेचे शेअर्स दिले जातील.
आज माहिती देताना कंपनीने सांगितले की, डिलिस्टिंगनंतर आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या गुंतवणूकदारांना (Investors) दिले जातील. जर तुमच्याकडे सिक्युरिटीजचे 100 शेअर्स असतील तर तुम्हाला त्या बदल्यात ICICI बँकेचे 67 शेअर्स मिळतील.
दरम्यान, या डिलिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 12 ते 15 महिने लागू शकतात. जर तुमच्याकडे ICICI सिक्युरिटीजचे शेअर्स असतील, तर ICICI बँकेचे शेअर्स डेमेडमध्ये जमा होताच ICICI सिक्युरिटीजचे शेअर्स रद्द केले जातील.
ICICI सिक्युरिटीजचा IPO 2018 साली आला होता. या IPO ची इश्यू किंमत 520 रुपये होती, परंतु त्याची लिस्टिंग 431 रुपये होती. कंपनीचा हा स्टॉक अंडरपरफॉर्म असल्याने त्याला डीलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डीलिस्टिंगच्या निर्णयानंतर शेअरमध्ये (Share) किंचित वाढ झाली. आजच्या व्यवहारानंतर सिक्युरिटीजचा शेअर 614 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे.
सध्या बाजारात ब्रोकरेज व्यवसायात झेरोधा आणि ग्रोव सारख्या कंपन्या प्रसिद्ध आहेत. ICICI सिक्युरिटीज 6.8 टक्के मार्केट शेअरसह पाचव्या स्थानावर आहे. मे 2023 च्या अखेरीस, NSE मध्ये सक्रिय ग्राहकांची संख्या 2.1 दशलक्ष होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.