Hyundai i10  Dainik Gomantak
अर्थविश्व

6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 'या' कारचा मारुती वॅगनआरच्या राजवटीला धक्का; मोडला मोठा रेकॉर्ड

Hyundai i10 vs Maruti WagonR: गेल्या 25 वर्षांपासून मारुती वॅगनआरच्या राजवटीला कोणीही आव्हान देऊ शकलेले नव्हते. मात्र आता 6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या हॅचबॅक कारने मारुतीचा मोठा रेकॉर्ड मोडला.

Manish Jadhav

गेल्या 25 वर्षांपासून मारुती वॅगनआरच्या राजवटीला कोणीही आव्हान देऊ शकलेले नव्हते. मात्र आता 6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या हॅचबॅक कारने मारुतीचा मोठा रेकॉर्ड मोडला. ही कार ह्युंदाईची i10 असून जी भारतात गेल्या 18 वर्षांपासून लॉन्च होत असून तिने आता मारुती वॅगनआरला मागे सोडले. ही ह्युंदाई कार 2007 मध्ये भारतीय मार्केटमध्ये पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आली होती. ही कार स्टॅंडर्ड फीचर्स म्हणून ड्युअल एअरबॅग्ज देणाऱ्या पहिल्या कारपैकी एक होती. याशिवाय, ABS आणि चावीशिवाय डोअर लॉक यासारखे फीचर्स ती भारतात घेऊन आली होती. आता तिने मारुती वॅगनआरचा विक्रीचा रेकॉर्ड मोडला.

18 वर्षांत रचला रेकॉर्ड

दरम्यान, मारुती वॅगनआरच्या 25 वर्षांच्या प्रवासात सुमारे 34 लाख वाहने विकली गेली, तर ह्युंदाई आय10 ने अवघ्या 18 वर्षात 33 लाख वाहने विकण्याचा रेकॉर्ड केला. या कारचे 3 जनरेशन मॉडेल आधीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे मॉडेल्स हुंडई आय10, ग्रँड आय10 आणि ग्रँड आय10 निओस आहेत. भारतात (India) Hyundai i10 च्या सुमारे 20 लाख युनिट्स विकल्या गेल्या असून कंपनीने भारतात 13 लाख युनिट्सची निर्मिती केली आहे. या कारची 140 देशांमध्ये निर्यात करण्यात आली. भारतातून ह्युंदाईने ही कार दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चिली आणि पेरु सारख्या मार्केटमध्ये विकली.

Hyundai i10

पॉवरफुल कार

कंपनीने ह्युंदाई आय10 च्या तिन्ही पिढीच्या मॉडेल्समध्ये शक्तिशाली इंजिन ऑप्शन दिले आहेत. सध्या, Hyundai Grand i10 Nios मध्ये 1.2-लिटर कप्पा पेट्रोल मॅन्युअल, 1.2-लिटर कप्पा पेट्रोल एएमटी आणि 1.2-लिटर बाय-फ्यूल कप्पा पेट्रोल सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शन उपलब्ध आहेत. भारतात दरवर्षी सुमारे 1 लाख ह्युंदाई आय10 विकल्या जातात.

Hyundai i10 Nios ची सुरुवातीची किंमत 5.98 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 9.70 लाख रुपयांपर्यंत जाते. या मालिकेतील नवीन एंट्री ह्युंदाई ग्रँड आय10 निओस, 2019 मध्ये भारतीय मार्केटमध्ये (Indian Market) लॉन्च करण्यात आली. या कारची सर्वाधिक विक्री गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये झाली. त्याचवेळी, या कारच्या खरेदीदारांमध्ये 83 टक्के विवाहित लोक असून 45 टक्के लोक पहिल्यांदाच खरेदीदार आहेत.

मारुती वॅगनआर देखील मागे पडली

हुंडई आय10 ने मारुती वॅगनआरच्या रेकॉर्डला आव्हान दिले आहे. ही कार डिसेंबर 1999 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. आतापर्यंत याच्या 33.7 लाख युनिट्स विकल्या गेल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात मारुती वॅगनआरने 1.98 लाख युनिट्सची विक्री केली. ही भारतातील मध्यमवर्गीयांची आवडती कार आहे. 4 ते 5 लोक असणाऱ्या फॅमिलीसाठी ही परफेक्ट कार आहे. या कारच्या बॉक्सी डिझाइनमुळे उत्तम हेडरुम मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT