How to check PF balance Dainik Gomantak
अर्थविश्व

2 मिनिटात करा आपला PF बॅलेंस चेक

PF बॅलेंस चेक करण्यासाठी या सोप्या स्टेप जाणून घ्या

Priyanka Deshmukh

प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी पीएफ हा मोठा आधार असतो, त्यामुळे तुमचा पीएफ शिल्लक किती आहे हे तुम्ही वेळोवेळी तपासत राहणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची (PF Account) शिल्लक तपासायची असल्यास, खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची शिल्लक राशी सहज तपासू शकता. (How to check PF balance)

मिस्ड कॉलवरून त्वरित माहिती मिळवा

PF खात्याशी लिंक केलेल्या रजिस्टर नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करा. यानंतर लवकरच, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत नंबरवर एक संदेश येईल, ज्यामध्ये पीएफ शिल्लक माहितीचा तपशील उपलब्ध असेल.

एसएमएसद्वारे मिळणार माहिती

ईपीएफओकडे (EPFO) नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि मराठीमध्ये माहिती हवी असल्यास MRA लिहायचे आहे. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल.

उमंग अॅपद्वारे तुम्ही माहिती तपासू शकता

उमंग अॅपद्वारे तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी उमंग अॅपमधील EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ते टाकल्यानंतर तुम्ही ईपीएफ शिल्लक तपासू शकता.

अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा

तुमची PF शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक ओपन होइल ज्यामध्ये तुम्ही तुमचा शिल्लक पीएफ पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT