Online RTO Service: भारतातील कार मार्केटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील लोकांचे वाढते उत्पन्न आणि सुविधांमुळे वैयक्तिक कारकडे लोकांचा कल वाढला आहे. महानगर असो किंवा लहान शहर, लोकांना स्वतःचे वाहन सोयीचे वाटते. परंतु वाहन चालवताना वाहन धारकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
अनेक वेळा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढताना काही चुकांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ते दुरुस्त करण्यासाठी खूप वेळ जायचा परंतु आता आरटीओने अनेक कामांची प्रक्रिया ऑनलाइन (Online) केली आहे. ड्रायव्हर्स आता घरी बसूनच ड्रायव्हिंग लायसन्स सुधारू शकतात.
ड्रायव्हिंग लायसन्स दुरुस्त करणे सोपे झाले
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये दुरुस्ती करणे खूप सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रस्ते (Road) वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्ही तुमचा परवाना बदलू शकता.
कागदपत्रांची PDF प्रत तयार ठेवा
जर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समधील जन्मतारीख किंवा नावात काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आधार कार्ड, 10 वी किंवा 12वी प्रमाणपत्र, तुमच्याकडे पासपोर्ट असल्यास त्याची एक प्रत, महापालिकेकडून दिलेला जन्म दाखला आणि नाव बदलण्यासाठी वृत्तपत्रात दिलेली ही सर्व कागदपत्रे येथे जमा करावी लागतील. तुम्ही आता https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये स्वतः सुधारणा करू शकता. तुम्हाला कुठेही काही मदत हवी असेल तर तुम्ही 1076 हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.