Electricity Bill Dainik Gomantak
अर्थविश्व

Electricity Bill: होळीनंतर वीज महागणार, 'या' राज्यातील जनतेला बसणार मोठा धक्का!

Manish Jadhav

Holi 2023: पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईनंतर आता विजेचे दरही वाढवण्याची तयारी सुरु आहे. होळीनंतर झारखंडमधील लोकांना विजेचे झटके बसू शकतात.

राज्यात विजेचे दर वाढवण्याची तयारी सुरु आहे. झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेडने राज्य वीज नियामक आयोगासमोर विजेच्या दरात 20% पर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

आयोगाने या प्रस्तावाचा अभ्यास केला असून या महिन्याच्या अखेरीस विविध विभागात जनसुनावणी आयोजित केली जाणार आहे.

आयोग नवीन दर निश्चित करेल

जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोग नवीन दर निश्चित करेल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर येत्या एप्रिल महिन्यापासून लागू होतील.

झारखंड (Jharkhand) बिजली वितरण निगम लिमिटेडने नवीन दरांबाबत दिलेला प्रस्ताव 2023-24 या वर्षासाठीचा आहे. बिजली वितरण निगमने 7400 कोटी रुपयांचा तोटा दाखवला असून हा तोटा भरुन काढण्यासाठी विजेचे दर वाढवण्याची गरज आहे.

2023-2024 या आर्थिक वर्षासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे वार्षिक महसूल अहवाल (ARR) दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांपासून विजेचे दर वाढलेले नाहीत

त्यानुसार महामंडळाला 2020-2021 मध्ये 2200 कोटी, 2021-2022 मध्ये 2600 कोटी आणि 2022-2023 मध्ये 2500 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून विजेचे दर वाढवलेले नसल्यामुळे तुटीचे प्रमाण वाढत असल्याचा युक्तिवादही महामंडळाने केला आहे.

कोरोनाच्या काळात सरकारने (Government) कोणतीही वाढ केलेली नाही. वीज नियामक आयोगात अध्यक्ष आणि दोन्ही सदस्यांची पदे रिक्त असल्याने वीज दरात फेरबदलाचा विचार होऊ शकला नाही.

JBVNL च्या वतीने आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या टॅरिफ याचिकेत, खर्चासाठी 9000 कोटींची संभाव्य गरज सांगितली आहे.

असे सांगण्यात येत आहे की, नवीन वीज दर निश्चित करण्यापूर्वी लवकरच आयोग विविध विभागांमध्ये जनसुनावणी घेईल आणि सामान्य जनता, उद्योजक, जेबीव्हीएनएल आणि इतर क्षेत्रातील लोकांचे मत घेईल आणि त्यानंतर अंतिम दरांवर शिक्कामोर्तब करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT