तुम्ही कधी तुमच्या फ्लाइट टिकीट जवळून पहिले आहेत का? जर होय, तर तुम्हाला विकास शुल्क (UDF) प्रवासी सेवा शुल्क आणि विमान सुरक्षा शुल्क यासारख्या विविध शूल्काना सामोरे जावे लागू शकते. तर आपण दिलेले पैसे कसे वापरले जातात हे जाणून घेऊया. (Travel News Updates)
* युडिएफ:
विमान तिकीटामध्ये हे सर्वात सामान्य शुल्क आहे. विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी प्रवाशकडून शुल्क आकारले जाते. हे शुल्क तुम्ही ज्या विमानतळावरून प्रवास सुरू करता त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, दिल्ली विमानतळावरून सुरू होणाऱ्या प्रवाशासाठी UDF शुल्क 63 रुपये आहे तर मुंबईहून येणाऱ्या प्रवाशासाठी 142 रुपये आहे.
* एअरलाइन इंधन शुल्क:
ग्राहकांना जास्त इंधन खर्च देण्यासाठी, प्रवाशांकडून मूळ भाड्याच्या व्यतिरिक्त एअरलाइन इंधन शुल्क किंवा इंधन अधिभार' आकारू शकतात. उदाहरणार्थ, काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी वाढत्या इंधनाच्या किमतीला प्रतिबिबित करण्यासाठी एप्रिल 2021 पासून इंधन अधिभार शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
CUTE फी:
याला पॅसेजर ऑपरेटिंग फी (PHF) असेही म्हणतात. विमानतळावर सेवा देण्यासाठी हे शुल्क आकारले जाते. तुम्ही जिथून प्रवास करत असणार त्या विमानतळावर (Air Port) देखील अवलंबून असते आणि ते प्रति प्रवासी रु. 50 ते 100 रु. पर्यंत असते.
आरसीएस शुल्क :
सेवा न मिळालेल्या भागात प्रादेशिक कनेटिव्हिटी योजनेला निधी देण्यासाठी, सरकारने प्रादेशिक कनेटिव्हिटी योजना (RCS) सुरू केली. बहुतेक विमानतळावरून निघणाऱ्या प्रवाशांवर RCS शुल्क आकारारले जाते. या योजनेतर्गत समाविष्ट विमातळाच्या विकासासाठी प्रत्येक प्रवाशाकडून 50 रुपये शुल्क आकारले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.