Cheapest Petrol Dainik Gomantak
अर्थविश्व

World's Cheapest Petrol Prices: 'या' देशात 1 लिटर पेट्रोल मिळतेय फक्त 1.5 रुपयांत, पण ते हाँगकाँगसह...!

World Cheapest Petrol: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईही गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे.

Manish Jadhav

World's Cheapest Petrol Prices: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईही गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे.

अनेक तज्ञांचे असे मत आहे की, जर इंधनाची किंमत कमी केली तर महागाई काही प्रमाणात आटोक्यात आणता येईल, कारण त्याचा वापर कारखाने, मोठ्या उत्पादन युनिट्समध्ये चालणारी मशीन आणि इतर अनेक कामांमध्ये केला जातो.

मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असा एक देश आहे, जिथे पेट्रोल फक्त 1.5 रुपये प्रति लिटर आहे. होय! तुम्ही बरोबर ऐकले. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल खूप स्वस्त आहे, जिथे तुम्हाला 1 लिटर पेट्रोलसाठी 1.5 रुपये मोजावे लागतात.

या देशांमध्ये किंमत काय आहे?

जर सर्वात स्वस्त पेट्रोल विकण्याबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीत इराणचा देखील समावेश आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इराणमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत सुमारे 4.76 रुपये आहे.

तर, अंगोलामध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत सुमारे 17.82 रुपये आहे. याशिवाय, अल्जेरियामध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत 25.15 रुपयांच्या दरम्यान आहे.

कुवेतमध्ये (Kuwait) 1 लीटर पेट्रोलसाठी तुम्हाला फक्त 25 ते 26 रुपये मोजावे लागतात. तर सुदानमध्ये ही किंमत 27.53 रुपये इतकी आहे.

सर्वात महाग पेट्रोल कुठे आहे?

जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये (Hong Kong) उपलब्ध आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथे 1 लिटर पेट्रोलची किंमत 234.33 रुपये आहे. तर फिनलंडमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 208.40 रुपये मोजावे लागतात. आयलँड पेट्रोल 206.48 रुपये प्रति लीटर आहे.

जे नॉर्वेला चांगला देश मानतात, त्यांना सांगा की नॉर्वेमध्ये 201.68 रुपये प्रति लीटर मिळते. ग्रीसमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला सुमारे 199.76 रुपये मोजावे लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT