HDFC Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC बॅंकेची बंपर कमाई, सप्टेंबरच्या तिमाही उत्पन्नात तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ !

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठी कमाई केली आहे.

Manish Jadhav

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठी कमाई केली आहे. सप्टेंबर तिमाहीत HDFC बँकेचा नफा 15,796 कोटी रुपये होता. या काळात बँकेच्या एकूण उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 70 टक्क्यांनी वाढून 78,406 कोटी रुपये झाले आहे. निव्वळ व्याज उत्पन्नाबद्दल बोलायचे झाल्यास, इथेही 30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

दरम्यान, सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेने ग्राहकांच्या (Customers) व्याजातून 27,385 कोटी रुपये वसूल केले आहेत. प्रोविजन्सबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीत तो 2904 कोटी रुपये होता.

सप्टेंबर तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग नफा देखील 30.5 टक्क्यांनी वाढून 22,694 कोटी रुपये झाला आहे. एकूण कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीत त्यात 1.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

0.24 टक्क्यांनी शेअर्समध्ये घसरण

सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.24 टक्क्यांनी घसरले. वास्तविक, बँकेचा निकाल बाजार बंद झाल्यानंतर आला आहे. या निकालाचा परिणाम उद्या त्यांच्या शेअर्सवर दिसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

उत्कृष्ट निकालानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वास्तविक, गेल्या एका महिन्यात एचडीएफसी बँकेचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहेत. आता बँकेच्या उत्कृष्ट निकालानंतर गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

एनपीए वाढला

उत्कृष्ट निकालांदरम्यान HDFC बँकेचा (HDFC Bank) NPA वाढला आहे. तिमाही आधारावर, देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा NPA 0.30 टक्क्यांवरुन 0.35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत, HDFC बँकेची तरतूदही 2,860 कोटींवरुन 2,904 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वीच एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाले. त्यानंतर बँकेची स्थिती आणखी चांगली होईल, अशी अटकळ बांधली जात होती. एचडीएफसी बँक ही बाजारमूल्याच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT