HDFC Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC ने ग्राहकांना दिला मोठा झटका, 'या' कामासाठी मोजावे लागणार जास्त पैसे!

HDFC Bank: तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

HDFC Bank: तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे.

HDFC बँकेने (HDFC Bank) दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 7 सप्टेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. म्हणजेच जन्माष्टमीला व्याजदर वाढवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

15 बेसिस पॉइंट वाढ

बँकेकडून ओव्हरनाइट MCLR 8.35 टक्क्यांवरुन 8.50 टक्क्यांनी 15 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेचा एक महिन्याचा MCLR 8.45 टक्क्यांवरुन 10 bps ने वाढून 8.55 टक्के झाला आहे.

त्याचप्रमाणे, तीन महिन्यांचा MCLR 8.70 टक्क्यांवरुन 8.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, सहा महिन्यांचा MCLR 8.95 वरुन 9.05 पर्यंत वाढवला आहे.

याशिवाय, सर्व कर्जांशी जोडलेला एक वर्षाचा MCLR दर 5 bps ने 9.10 टक्क्यांवरुन 9.15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

त्याचवेळी, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 5 bps ने वाढवून अनुक्रमे 9.20 टक्के आणि 9.25 टक्के केले आहे. अशा प्रकारे बँकेने सर्व मुदतीची कर्जे महाग केली आहेत.

फ्लोटिंग व्याजदरावर आरबीआयचा नियम

एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) प्रणाली अंतर्गत, आरबीआयने बँकांना फ्लोटिंग रेट हाऊस लोनचे व्याज दर आणि मासिक हप्ता बदलताना पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले आहेत.

आरबीआयच्या (RBI) वतीने, गृहकर्ज ग्राहकांना निश्चित दरावर स्विच करण्याचा पर्याय देण्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT