HDFC Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC Bank चा ग्राहकांना मोठा झटका, आता 'या' कामासाठी मोजावे लागणार अधिक पैसे!

HDFC Bank MCLR Rate: तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल.

Manish Jadhav

HDFC Bank MCLR Rate: तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. होय, बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

बँकेने MCLR दर 0.05 टक्क्यांवरुन 0.15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

होम आणि कार लोन महागणार

MCLR दर वाढल्याने थेट होम लोन आणि कार लोनच्या EMI वर परिणाम होईल. यामुळे, भविष्यात तुम्ही लोन घेतल्यास, तुम्हाला हप्त्याच्या स्वरुपात (EMI) जास्त पैसे द्यावे लागतील.

HDFC बँकेच्या (HDFC Bank) मते, वन नाइसाठी MCLR दर 7.95% वर गेला आहे. त्याचवेळी, हा दर एका महिन्यासाठी 8.10% आणि तीन महिन्यांसाठी 8.40% असेल. सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.80 टक्के आहे.

MCLR किती वाढला आहे?

त्याचप्रमाणे, ते एका वर्षासाठी 9.05% आणि दोन वर्षांसाठी 9.10% आहे. MCLR दर तीन वर्षांसाठी 9.20% पर्यंत वाढला आहे. MCLR वाढवण्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला बँकेकडून मिळणारे लोन महाग होईल.

जर तुम्ही आधीच होमलोनचे हप्ते भरत असाल तर यामुळे तुमचा ईएमआय वाढेल आणि तुम्ही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.

दुसरीकडे, बँकेने केलेली ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर (Interest Rate) लागू आहे. त्याचा निश्चित व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. MCLR हा किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना लोन देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT