HDFC
HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC बँकेने ग्राहकांना दिली खूशखबर, लगेच ई-मेल पाहा

दैनिक गोमन्तक

HDFC Bank FD Rates: HDFC बँकेत तुमचेही खाते असेल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. ही आनंदाची बातमी बँकेने मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांना दिली आहे. खरेतर, सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी बँकेच्या ग्राहकांना ई-मेल आले की, बँकेने एफडी दर 5.45 टक्क्यांवरुन 6.25 टक्के केला आहे. मात्र, हा 6.25 टक्के व्याजदर काही अटींवरच दिला जाईल.

2 कोटींपेक्षा कमी एफडी असलेल्यांना याचा लाभ मिळेल

मात्र, दिवाळीनंतर लगेचच बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. FD च्या नवीन व्याजदरातील बदल बँकेने 26 ऑक्टोबर 2022 रोजी लागू केला होता. एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) सांगण्यात आले की, 'वाढीव व्याजदराचा फायदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्यांना दिला जाईल. यावेळी व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.'

एफडी 10 वर्षांपर्यंत करता येते

बँकेने सांगितले की, 'आज केलेल्या वाढीनंतर, ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के ते 6.25 टक्क्यापर्यंत लाभ मिळेल. बँक ग्राहकांना (Customers) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुदत ठेव सुविधा प्रदान करते.'

HDFC बँक FD नवीन दर -

>> 7 ते 14 दिवस - 3%

>> 15 ते 29 दिवस - 3%

>> 30 ते 45 दिवस – 3.50 टक्के

>> 46 ते 60 दिवस – 4%

>> 61 ते 89 दिवस – 4.50 टक्के

>> 90 दिवस ते 6 महिने – 4.50 टक्के

>> 6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 5.25 टक्के

>> 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.50 टक्के

>> 1 वर्ष ते 15 महिने – 6.10 टक्के

>> 15 महिने ते 18 महिने – 6.15 टक्के

>> 18 महिने ते 21 महिने – 6.15 टक्के

>> 21 महिने ते 2 वर्षे – 6.15 टक्के

>> 2 वर्षे 1 दिवस - 3 वर्षे - 6.25 टक्के

>> 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 6.25 टक्के

>> 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 6.20 टक्के

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते

जर ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास, या ग्राहकांना सामान्य नागरिकांपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याजाचा लाभ मिळतो. आजच्या वाढीनंतर, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 6.95 टक्के व्याजदर मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

SCROLL FOR NEXT