HDFC
HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC ने केला मोठा बदल, करोडो ग्राहकांना मिळणार दुहेरी लाभ

दैनिक गोमन्तक

HDFC Bank Latest News: खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने दिवाळीनंतर ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. यापुढे बँकेच्या ग्राहकांना दुहेरी लाभ मिळणार आहे. याआधीही याच महिन्यात बँकेने व्याजदरात वाढ केली होती. आतापासून तुम्हाला FD वर किती व्याज मिळणार ते लगेच जाणून घ्या...

नवीन दर लागू

एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे नवीन दर 26 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. ज्यांची 2 कोटी रुपयांपेक्षा कमीची एफडी आहे, त्यांनाच या वाढीव व्याजदरांचा लाभ मिळेल. या वेळी बँकेने व्याजदरात (Interest Rate) 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD करता येते

बँकेने सांगितले की, या वाढीनंतर, ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के ते 6.25 टक्के लाभ मिळेल. बँक ग्राहकांना (Customers) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुदत ठेव सुविधा प्रदान करते.

HDFC बँक FD नवीन दर -

>> 7 ते 14 दिवस - 3%

>> 15 ते 29 दिवस - 3%

>> 30 ते 45 दिवस – 3.50 टक्के

>> 46 ते 60 दिवस – 4%

>> 61 ते 89 दिवस – 4.50 टक्के

>> 90 दिवस ते 6 महिने – 4.50 टक्के

>> 6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 5.25 टक्के

>> 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.50 टक्के

>> 1 वर्ष ते 15 महिने – 6.10 टक्के

>> 15 महिने ते 18 महिने – 6.15 टक्के

>> 18 महिने ते 21 महिने – 6.15 टक्के

>> 21 महिने ते 2 वर्षे – 6.15 टक्के

>> 2 वर्षे 1 दिवस - 3 वर्षे - 6.25 टक्के

>> ३ वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 6.25 टक्के

>> 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 6.20 टक्के

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते

जर ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास, तर या ग्राहकांना सामान्य नागरिकांपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याजाचा लाभ मिळतो. आजच्या वाढीनंतर, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 6.95 टक्के व्याजदर मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT