HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC बँकेने 15 दिवसांत दिली दुसरी मोठी बातमी! ग्राहकांचे बल्ले-बल्ले

HDFC Bank FD Rates: जर तुमचेही खाते HDFC बँकेत असेल तर तुम्हाला ही बातमी माहित असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

HDFC Bank FD Rates: जर तुमचेही खाते HDFC बँकेत असेल तर तुम्हाला ही बातमी माहित असणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याआधीही बँकेने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. ही दरवाढ ग्राहकांसाठी 26 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.

नवीन दर 8 ऑक्टोबरपासून लागू

26 ऑक्‍टोबरपासून व्याजदरात वाढ होणार असल्याची माहितीही बँकेच्या वतीने ई-मेलद्वारे ग्राहकांना देण्यात आली. आता पुन्हा एकदा एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) दोन कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (एफडी दर) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार नवीन दर 8 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.

एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले की, वाढीव व्याजदराचा फायदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्यांना दिला जाईल. बँकेने सांगितले की, वाढीनंतर, सामान्य ग्राहकांना (Customers) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के ते 6.25 टक्के लाभ मिळेल. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुदत ठेव सुविधा प्रदान करते.

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते

ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना इतर ग्राहकांच्या तुलनेत 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीत बँकेकडून 7 टक्के व्याज दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT