7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: खूशखबर, खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, DA मध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. 1 जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता लागू होणार आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. 1 जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता लागू होणार आहे. सरकारकडून डीएमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे.

पण याआधी गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करणारी बातमी समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सातव्या वेतन आयोगांतर्गत राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए/डीआरमध्ये 8 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

9.50 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ

सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्य सरकारचे सुमारे 9.50 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ आणि महागाई सवलतीचा फायदा होईल.

सरकारने (Government) डीएमध्ये केलेली 8 टक्के वाढ दोन भागांमध्ये लागू केली जाणार आहे. पहिले चार टक्के डीए 1 जुलै 2022 पासून लागू होईल. तर उर्वरीत 4 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. केंद्र सरकारच्या नियमानुसार डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे.

थकबाकी तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल

यापूर्वीची, थकबाकी सरकार तीन हप्त्यांमध्ये देणार आहे. थकबाकीचा पहिला हप्ता जून महिन्याच्या पगारासह दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे, दुसरा आणि तिसरा हप्ता ऑक्टोबर 2023 च्या पगारासह दिला जाईल.

डीए वाढवल्याने तिजोरीवर 4,516 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, असे सरकारकडून सांगण्यात आले. यापूर्वी, गुजरात सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये तीन टक्के डीए जाहीर केला होता. 1 जानेवारी 2022 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

तसेच, केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना (Employees) सध्या 42 टक्के भत्ता दिला जात आहे. केंद्राकडून 1 जुलैपासून पुढील डीए जाहीर केला जाणार आहे. यावेळी डीएमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT