GST  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Return: GST रिटर्न भरणाऱ्यांना दिवाळी भेट, सरकारने केली मोठी घोषणा

GST Return: छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

GST Return: छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सप्टेंबर महिन्याचा जीएसटी 21 ऑक्टोबरपर्यंत भरु शकता. खरं तर, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) सप्टेंबर महिन्याचा वस्तू आणि सेवा कर (GST) रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवून 21 ऑक्टोबर केली आहे. गुरुवारी जीएसटी पोर्टलच्या संथ कामामुळे करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागला. 20 ऑक्टोबर ही काही करदात्यांची मासिक जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती.

पोर्टलच्या संथ गतीवर, सीबीआयसीने सांगितले होते की, अंतिम मुदत वाढविण्याचा विचार केला जात आहे. CBIC ने शुक्रवारी ट्विट करत म्हटले की, "जीएसटी (GST) कौन्सिलने सप्टेंबर, 2022 साठी GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2022 ते 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे."

मुदत का वाढवली?

सीबीआयसीने सांगितले की, 'काही श्रेणीतील व्यावसायिकांसाठी जीएसटी रिटर्न भरण्याची गुरुवार ही शेवटची तारीख होती, परंतु बर्‍याच करदात्यांनी पोर्टलच्या संथ गतीबद्दल तक्रार केली, ज्यामुळे ते मासिक जीएसटी रिटर्न फॉर्म GSTR 3B भरु शकले नाहीत.'

यापूर्वी, सीबीआयसीने सांगितले होते की, आम्हाला जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) कडून प्रस्तावासह तक्रार प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये म्हटले की, जीएसटी पोर्टलच्या संथ गतीमुळे मासिक रिटर्न भरण्यात अडचण येत आहे, त्यामुळे त्याची अंतिम मुदत वाढवण्यात यावी. त्याचबरोबर CBIC च्या या निर्णयामुळे करदात्यांना विलंब शुल्क किंवा व्याजाचा बोजा पडणार नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, करदाते दर महिन्याच्या 20, 22 आणि 24 तारखेदरम्यान मासिक रिटर्न आणि कर भरणा फॉर्म GSTR-3B वेगवेगळ्या प्रकारे भरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

SCROLL FOR NEXT