GST: वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

Vrun Gabdhi: म्हणाले- मदतीच्या वेळी आम्ही दुखावतोय
Vrun Gandhi
Vrun GandhiDainik Gomantak

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवला आहे.आजपासून पॅकेज केलेल्या उत्पादनांवर लागू होणाऱ्या जीएसटी (GST) बाबत त्यांनी सरकारला गोत्यात आणले आहे. वरुण गांधी यांनी ट्विट केले की, आजपासून दूध,दही,लोणी,तांदूळ,डाळी,ब्रेड या पॅकेज्ड उत्पादनांवर जीएसटी लागू होणार आहे.

जीएसटी (GST) कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर सोमवारपासून विविध खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. यामध्ये पिठ,चीज आणि दही यांसारख्या पॅकेज केलेले आणि लेबल केलेले पदार्थ समाविष्ट आहेत. त्यावर पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या रूमवरही जीएसटी (GST) भरावा लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे.

Vrun Gandhi
GST News: पॅकेटबंद दही आणि पनीर होणार महाग, आता या गोष्टींवरही भरावा लागणार कर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com