GST Collection  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Collection: मोदी सरकारसाठी मोठी बातमी, जीएसटी कलेक्शन तब्बल 12 टक्क्यांनी वाढले

GST News: टॅक्सच्या आघाडीवर सरकारला फेब्रुवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले आहे.

Manish Jadhav

GST Collection In February 2023: फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारसाठी मोठी बातमी आली आहे. टॅक्सच्या आघाडीवर सरकारला फेब्रुवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले आहे.

केंद्र सरकारची (Central Government) कमाई 12 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वित्त मंत्रालयाने आकडेवारी जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

अर्थ मंत्रालयाने माहिती दिली

बुधवारी फेब्रुवारी 2023 साठी जीएसटी (GST) संकलनाची आकडेवारी जाहीर करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले की, या महिन्यात उपकर म्हणून 11,931 कोटी रुपये जमा झाले, जी जीएसटी लागू झाल्यानंतरची सर्वोच्च पातळी आहे. मात्र, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसुलात घट झाली आहे.

जानेवारी 2023 मध्ये विक्रमी संकलन झाले

जानेवारी 2023 मध्ये 1.57 लाख कोटी रुपयांचा कर संकलन झाला होता, जो आजपर्यंतचा दुसरा सर्वोच्च स्तर आहे. एप्रिल 2022 मध्ये जमा झालेले 1.68 लाख कोटी रुपये ही जीएसटीची सर्वोच्च पातळी आहे.

मंत्रालयाने निवेदन जारी केले

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपये होते. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 27,662 कोटी रुपये आहे, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 34,915 कोटी रुपये आहे.

त्याचवेळी, एकात्मिक GST (IGST) अंतर्गत 75,069 कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय, 11,931 कोटी रुपयांच्या उपकराचाही समावेश आहे.

12 टक्के संकलन वाढले

वर्षभरापूर्वी याच महिन्यात जीएसटी संकलन 1.33 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, फेब्रुवारी 2023 मध्ये, जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढले आहे. मंत्रालयाने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवस असल्याने जीएसटी संकलन इतर महिन्यांच्या तुलनेत कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT