ऑगस्ट 2021 या महिन्यात देशाचे जीएसटी संकलन (GST Collection) एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे . याआधी मागच्या जुलै महिन्यातही केंद्र सरकारने जीएसटीच्या (Goods And Service Tax) माध्यमातून एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला होता. बुधवारी अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी रुपयांचा जीएसटी केंद्राला प्राप्त झाला आहे. हा आकडा गेल्या वर्षी याच महिन्यातील संकलनापेक्षा 30 टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात एकूण 1,12,020 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन (Tax Collection) झाले आहे. (GST Collection in August month cross one lakh cr.)
निवेदनात म्हटले आहे की सरकारला केंद्रीय जीएसटी म्हणून 20,522 कोटी रुपये, राज्य जीएसटी म्हणून 26,605 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी म्हणून 56,247 कोटी रुपये (मालाच्या आयातीतून गोळा केलेल्या 26,884 कोटी रुपये) तर उपकर 8,646 कोटी रुपये मिळाले आहेत.
सरकारला जीएसटीच्या स्वरूपात हे उत्पन्न जुलै 2021 मध्ये जमा झालेल्या 1.16 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ऑगस्ट, 2021 मध्ये उत्पन्न झालेले उत्पन्न हे जीएसटीच्या माध्यमातून गेल्या वर्षी याच महिन्यात मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा 30 टक्के अधिक आहे. ऑगस्ट, 2020 सरकारने जीएसटीद्वारे 86,449 कोटी रुपयांचा महसूल वाढवला होता.मंत्रालयाने म्हटले आहे की ऑगस्ट, 2021 मध्ये ऑगस्ट, 2019 च्या तुलनेत 14 टक्के अधिक जीएसटी संकलन होते. सरकारने ऑगस्ट, 2019 मध्ये 98,202 कोटी रुपये GST म्हणून उभारले होते.
याअगोदर 2020 चा विचार करता या वर्षात सलग नऊ महिने जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे, जून 2021 मध्ये ते 1 लाख कोटी रुपयांच्या बेंचमार्कवरून मोठ्या प्रमाणात घसरले होते.मागील काही दिवसांत कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने भारतीय बाजार तेजीत दिसत आहे. आणि जीएसटी संकलनाच्या आकडेवारीमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या दोन महिन्यांत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचे जीएसटी संकलन अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचे देखील दर्शवते आहे .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.