Anil Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Notice To Reliance General Insurance: अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, कंपनीला 922 कोटींच्या टॅक्सची नोटीस

GST Notice to Reliance General Insurance: कर्जबाजारी अनिल अंबानी यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Manish Jadhav

GST Notice to Reliance General Insurance: कर्जबाजारी अनिल अंबानी यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला जीएसटीची नोटीस मिळाली आहे. GST इंटेलिजन्स महासंचालनालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्याची बातमी येत आहे.

हिंदुजा ग्रुपने सर्वात मोठी बोली लावली आहे

कंपनीला ही नोटीस अशा वेळी देण्यात आली आहे, जेव्हा रिलायन्स कॅपिटल सध्या एनसीएलटी प्रक्रियेतर्गंत कर्ज (Loan) निराकरणातून जात आहे. यावेळी हिंदुजा ग्रुपने यासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे.

DGGI कडून 4 नोटिसा मिळाल्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला GST इंटेलिजन्स महासंचालनालयाकडून (DGGI) 478.84 कोटी रुपयांच्या पुनर्विमा आणि सह-विमा यांसारख्या सेवांमधून मिळणार्‍या महसुलावर चार नोटिसा मिळाल्या आहेत, रु. 359.70 कोटी, रु. 78.66 कोटी आणि रु. अनुक्रमे 5.38 कोटी रुपये जीएसटीची मागणी करण्यात आली आहे.

ही माहिती द्यावी लागेल

कर तज्ज्ञांच्या मते, RGIC च्या लेखापरीक्षकांना ही रक्कम आकस्मिक उत्तरदायित्व म्हणून 30 सप्टेंबर रोजी संपणाऱ्या तिमाही निकालांमध्ये कळवावी लागेल. RGIC NCLT मध्ये कर्ज निराकरण प्रक्रियेचा सामना करत आहे.

कंपनीच्या मूल्यांकनावर परिणाम होईल

बँकर्स म्हणाले की, नवीन मागणीचा कंपनीच्या मूल्यांकनावर परिणाम होईल. हिंदुजा समूहाने कंपनीसाठी 9,800 कोटी रुपयांची रोख ऑफर केली होती. कंपनीने 22,000 कोटी रुपयांचे कर्ज चुकवल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये रिलायन्स (Reliance) कॅपिटलला कर्ज निराकरणासाठी पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT