Mobile Banking Dainik Gomantak
अर्थविश्व

मोबाईल बँकिंग वापरताय? वन प्लस, सॅमसंग, गुगल पिक्सल यूजर्संना सरकारची महत्त्वाची सूचना

Mobile Banking: जर तुम्ही Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोनवरुन ऑनलाइन बँकिंग करत असाल तर सावधान...

Manish Jadhav

Mobile Banking: जर तुम्ही Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोनवरुन ऑनलाइन बँकिंग करत असाल तर सावधान... कारण सरकारने या ब्रँडच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) नुसार, Google Pixel, Samsung आणि OnePlus ऑपरेटिंग सिस्टम आधारित स्मार्टफोन्स सारख्या Android स्मार्टफोन वापरकर्त्यांना धोका आहे.

या स्मार्टफोनमध्ये अनेक कमतरता निदर्शनास आल्या आहेत. या स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा ऑनलाइन ऍक्सेस केला जाऊ शकतो.

ऑनलाइन बँकिंग वापरकर्त्यांसाठी धोका

अहवालानुसार, भारत (India) एक मोठी डिजिटल बाजारपेठ आहे, जिथे ऑनलाइन पेमेंटसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आधारित स्मार्टफोनचा वापर केला जातो. हे Google च्या मालकीचे OS आहे.

आयफोन सोडला तर, जगातील बहुतेक स्मार्टफोन जसे की, Google, Samsung, OnePlus आणि Nothing या Google आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.

अशा स्थितीत या सर्व स्मार्टफोनचे लोकेशन, बँकिंग डिटेल्ससह अनेक संवेदनशील माहिती ट्रॅक करता येऊ शकते.

कोणत्या स्मार्टफोनला धोका आहे?

जर तुमचा स्मार्टफोन Google ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन 11, 12, 12L, 13 वर काम करत असेल तर तुम्हाला धोका आहे. हे टाळण्यासाठी तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल.

अनेक लोक वेळोवेळी आपला फोन अपडेट करत नाहीत, अशा लोकांसाठी धोका ठरु शकतो. सरकारने (Government) फक्त जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोन्ससाठी इशारा दिला आहे.

कसे अपडेट करावे

सर्वात आधी तुम्ही Settings या पर्यायावर जावे.

यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये जावे लागेल.

तुमचे सॉफ्टवेअर अपडेट केलेले नसेल तर ते डाउनलोड करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT