PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Scheme: मोदी सरकारने जनतेला दिली मोठी भेट, 'या' योजनांमधून मिळतोय लाखोंचा फायदा!

Modi Government: 2014 पासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत.

Manish Jadhav

Modi Government: 2014 पासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अनेक योजना सुरु केल्या. या योजनांच्या माध्यमातून लोकांना भरपूर लाभ देण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे, जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण प्रदान करते.

बचत बँक किंवा पोस्ट ऑफिस (Post Office) खाते असलेल्या 18-70 वयोगटातील व्यक्तींना या योजनेंतर्गत नोंदणी करण्याचा अधिकार आहे.

अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी या योजनेत 2 लाख रुपयांचे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व कवच (अंशिक अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख रुपये) उपलब्ध आहे.

स्टार्टअप इंडिया

मोदी सरकारने जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरु केला होता. स्टार्टअप इंडिया लाँच करण्याचा उद्देश देशातील इनोवेशन आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हा होता, ज्यामुळे आर्थिक वाढ होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या उपक्रमाद्वारे, स्टार्टअप्संना इनोवेशन आणि डिझाइनद्वारे विकसित करण्यासाठी सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पीएम किसान सन्मान निधी

PM-KISAN ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी 2019 मध्ये जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आली होती.

थेट लाभ हस्तांतरण (DBT) मोडद्वारे देशभरातील शेतकरी (Farmer) कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6000 रुपयांचा आर्थिक लाभ हस्तांतरित केला जातो.

ही योजना सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी (SMF) होती, परंतु नंतर योजनेची व्याप्ती सर्व जमीनधारक शेतकर्‍यांसाठी वाढवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT