Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: होळीपूर्वी आली मोठी बातमी, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 44 टक्क्यांनी वाढणार!

7th Pay Commission Latest Update: 7 व्या वेतन आयोगानंतर सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग स्थापन करणार आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर सरकार लवकरच 8 वा वेतन आयोग स्थापन करणार आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 44 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

यासह फिटमेंट फॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणत्याही सूत्रावर पगाराचे पुनरावलोकन केले पाहिजे. त्याचबरोबर जुन्या आयोगाच्या तुलनेत या वेतन आयोगात बरेच बदल पाहायला मिळतील.

पगार थेट 18,000 वरुन 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो

सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 14.29 टक्क्यांनी वाढ झाली आणि या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये निश्चित करण्यात आले.

त्याचवेळी, आठव्या वेतन आयोगांतर्गत, असे मानले जाते की, यावेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असू शकतो, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात 44.44 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर, कर्मचार्‍यांचा किमान पगार थेट 18,000 रुपयांवरुन 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारकडून (Central Government) कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही. दुसरीकडे, सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार 2024 मध्ये आठवा वेतन आयोग लागू करु शकते.

विशेष म्हणजे, तो 2026 मध्ये लागू केला जाऊ शकतो. याची अंमलबजावणी करण्यासाठी 2024 मध्ये वेतन आयोग देखील स्थापन केला जाऊ शकतो. त्याचबरोबर, देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: स्वत:च्या स्वातंत्र्यसैनिकांची विटंबना कुठल्याच देशातले लोक करतात? जे ब्रिटिशांना करता आले नाही, ते आम्ही करत आहोत...

Goa: 1510 साली पोर्तुगीज जवळजवळ समुद्रात बुडाले, ताळगांवच्या शेतकऱ्यांनी त्यांना वाचवले; गोव्याची सांस्कृतिक परंपरा

Kaushiki Chakraborty in Goa: 'कौशिकी चक्रवर्ती' येणार गोव्यात! 'पंख'चे होणार सादरीकरण; गोमंतकीयांसाठी सोहळा

मेरी जान को खतरा है! गोवा माईल्सच्या चालकाने येण्यास दिला नकार, पर्यटकाला करावी लागली 1 km पायपीट; आणखी एका महिलेला आला धक्कादायक अनुभव Watch Video

Goa: किती ‘एमएसएम’, स्टार्टअप बंद पडले याची माहिती जनतेला द्या! प्रतीक्षा खलप यांची मागणी; GST उत्सवावर केली टीका

SCROLL FOR NEXT